ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक बच्चनची भावनिक पोस्ट

पाहा त्यानं या सुरेख नात्याबाबत लिहिलं तरी काय...   

Updated: Nov 2, 2020, 03:50 PM IST
ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक बच्चनची भावनिक पोस्ट
छाया सौजन्य - इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री आणि सौंदर्यासाठीच ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन हिनं नुकताच ४७ वा वाढदिवस साजरा केला. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, या साऱ्या शुभेच्छांमध्ये खास ठरला तो म्हणजे अभिषेक बच्चन Abhishek Bachchan. 

पती अभिषेक बच्चन यानं आपली पत्नी, ऐश्वर्य़ा हिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली. सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत त्यानं ऐश्वर्यासोबतचं आपलं नातं सर्वांपुढे ठेवलं. 

'आतापर्यंतच्या या प्रवासातील सर्व गोष्टींसाठी मी तुझा आभारी आहे...' असं म्हणत त्यानं पत्नी म्हणून ऐश्वर्याचं आपल्या जीवनाती स्थान सर्वांपुढं ठेवलं. ऐश्वर्याच्या आनंदासाठी म्हणून शुभेच्छा देत त्यानं तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं. 

 

अभिषेकनं हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर नीना गुप्ता, बॉबी देओल, रितेश देशमुख, अनिल कपूर, ईशा गुप्ता यांनीही ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या. मुख्य म्हणजे सोशल मीड्यावर या जोडीनं सर्वांचीच मनंही जिंकली.