'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्याचाही लवकरच साखरपुडा

म्हणे लगबग सुरु...   

Updated: Aug 19, 2019, 10:38 AM IST
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्याचाही लवकरच साखरपुडा

मुंबई : 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमावर येत अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बरेच खुलासे केले आहेत. असाच एक खुलासा 'ये जवानी है दिवानी' आणि 'आशिकी २' फेम अभिनेता आदित्य रॉय कपूर यानेही केला होता.  एका मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चांविषयी त्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. 

मॉडेल दिवा धवन आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. याचविषयी माहिती देत आपण एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गेलो असता माध्यमांच्या प्रतिनिधींनी आपले फोटो काढले आणि रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. पण, हे सारंकाही खोटं आहे; असं आदित्यने सांगितलं होतं. यामध्ये त्याने दिवा ही अतिशय चांगली मुलगी असल्याचंही नमूद केलं होतं. 

रिलेशनशिपच्या या चर्चांना हवा मिळत नाही तोच त्याच्या नात्यात दुरावा आल्याचंही म्हटलं गेलं. पण, आता मात्र ही जोडी पुन्हा एकत्र आली असून, आदित्य आणि दिवा लवकरच त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती देणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार आदित्य आणि दिवा पुढील काही महिन्यांतच साखरपुडा करणार आहेत. ज्यानंतर पुढच्या वर्षी त्यांच्या लग्नाचीही लगबग असण्याची अपेक्षा आहे. 

After constant denial of relationship, Aditya Roy Kapur and Diva Dhawan to get engaged?

'आशिकी २' या चित्रपटामुळे नावारुपास आलेला आदित्य सध्या त्याच्या या नात्यासोबतच आगामी चित्रपटांवरही लक्ष केंद्रीत करत आहे. तर, दिवा ही एक सुपरमॉडेल असून, मनिष मल्होत्रा, जे.जे. वाल्या, तरुण ताहिलानी या फॅशन डिझायनर्ससाठी ती वॉक करते. तेव्हा आता फॅशन आणि बॉलिवूड जगताची ही कायमस्वरुपी साथ कधी एकदा वेगळ्या वळणावर जाते, याकडेच अनेकांच्या नजरा आहेत.