close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सोबत झळकलेल्या अभिनेत्रीशीच सलमान बांधणार लग्नगाठ ?

याविषयीचा खुलासा करत ती म्हणते.... 

Updated: Aug 19, 2019, 09:29 AM IST
सोबत झळकलेल्या अभिनेत्रीशीच सलमान बांधणार लग्नगाठ ?

मुंबई : वयाची पन्नाशी उलटून गेली तरीही अभिनेता सलमान खान मात्र लग्नाच्या बेडित अकडलेला नाही. हिंदी कलाविश्वात 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' म्हणून सलमानकडे आजही पाहिलं जातं. असा हा अभिनेता अनेकदा लग्नाच्या प्रश्नांना बगलही देतो. पण, आता मात्र पुन्हा एकदा 'भाईजान' सलमानच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

कुटुंब, लग्न अशा सर्व गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवारा सलमान आता म्हणे त्याच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्रीशी लग्न करणार आहे. बी टाऊनचा 'दबंग खान' आणि त्याच्यासोबत 'वीर' या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री झरिन खान यांच्या लग्नाच्या चर्चांनी आता डोकं वर काढलं आहे. 

मुख्य म्हणजे इतर कोणी नव्हे, तर खुद्द झरिननेच एका मुलाखतीत सलमानची पत्नी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मुलाखतीत तिने करिअरपासून थेट सलमान खानच्या लग्नाचे बेत इथपर्यंतच्या चर्चा केल्या. अर्थात सलमान आपल्याशी लग्न करणार आहे ही एक विनोदी अफवा असल्याचं तिने न चुकचा स्पष्ट केलं.

झरिनला मुलाखतीदरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला, त्याचवेळी आपण लग्नासाठी तिने सलमानचा पर्याय निवडला. तिच्या या विनोदी आणि काहीशा अनपेक्षित उत्तरावर आता सलमान कसा व्यक्त होतो हो पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Is Salman Khan getting married to Zareen Khan? Here's what the actress says

कलाविश्वात सलमाननेच दिली होती नवी ओळख 

'वीर' या चित्रपटाटून सलमान खानने झरिनला कलाविश्वात पदार्पणाची संधी दिली होती. ज्यानंतर 'रेडी' या चित्रपटातही तिने लहानशी भूमिका साकारली होती. सध्याच्या घडीला बॉलिवूडपाठोपाठ ती तेलुगू आणि पंजाबी चित्रपट वर्तुळात आपलं नशीब आजमावत आहे.