'खिलाडी इज बॅक'; बेअर ग्रिल्ससोबत थरारक प्रवासादरम्यान अक्षय कुमार संकटात

संकट समोर येताच तो म्हणतोय....    

Updated: Aug 31, 2020, 02:25 PM IST
'खिलाडी इज बॅक'; बेअर ग्रिल्ससोबत थरारक प्रवासादरम्यान अक्षय कुमार संकटात  title=

मुंबई : खिलाडी कुमार म्हणून हिंदी कलाविश्वात नावारुपास आलेल्या अभिनेता अक्षय कुमार यानं अभिनयासोबतच थरारक आणि साहसी स्टंटवर विशेष भर दिल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. थराराच्या या आवडीपोटी त्याच्या चित्रपटांमध्येही अशी अनेक साहसदृश्य पाहायला मिळतात. असा हा खिलाडी कुमार परत आला आहे, पण यावेळी मात्र तो काही संकटांचाही सामना करताना दिसत आहे. 

संकटांच्या आणि अर्थातच साहसाच्या सत्रामध्ये त्याला साथ मिळत आहे ती म्हणजे Man vs. Wild फेम बेअर ग्रिल्स याची. बेअरसोबत जंगलाच्या वाटेवर निघालेल्या अक्षययला त्याच्याशी मिळतंजुळतं घेत असतानाच काही संकटांचाही सामना करावा लागला. ज्यामध्ये मग, पाण्याच्या अगदी जवळून एका दोरीच्या सहाय्यानं उलटं लटकून नदी ओलांडणं असो किंवा मग नव्य प्राण्यांच्या वाटेतून आपला मार्ग काढत थेट हत्तीची विष्ठा असणारी चहा पिणं असो. 

आपल्या विचाराच्या पलीकडे जाऊन या दोन्ही सेलिब्रिटींनी घेतलेला हा थरारक अनुभव नेमका कसा असेल हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? खुद्द अक्षयनंच याची एक झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. Into The Wild या विशेष कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यानं खऱ्या अर्थानं चाहत्यांना सतर्क केलं आहे. 

 

बेअरसोबतच्या या कार्यक्रमात यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार, थलैवा' अभिनेता रजनीकांतसुद्धा सहभागी झाले होते. यामागोमागच आता थरार आणि साहसावर विशेष प्रेम असणारा अक्षयही बेअरशी हातमिळवणी करताना दिसत असल्यामुळं चाहत्यांसाठी ही एक परवणीच असेल असं म्हणायला हरकत नाही.