मुंबई : देशभरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी अद्याप अनेक नेते मंडळी,अभिनेते तसेच उद्योजक कोरोना पॉझिटीव्ह आढळत आहेत. आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने ट्विट करत याबाबत माहिती दिली.
या घटनेने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच अभिनेता लवकरात लवकर बरा व्हावा अशी इच्छा चाहते व्यक्त करतायत.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही गोष्ट त्यांनी स्वतः ट्विटद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अनुराग ठाकूरलाही टॅग केले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटमध्ये काय म्हणाला ?
कान्स फेस्टीवलमधील इंडिया पॅव्हेलियनमध्ये आमचा सिनेमा बघण्यास खरोखरच उत्सुक होतो. परंतु दुर्दैवाने कोविड चाचणी सकारात्मक आली आहे.त्यामुळे मी विश्रांती घेत आहे. अनुराग ठाकूर आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. तिथे असणं खरंच मी खुप मिस करेन, असे तो म्हणाला आहे.
Was really looking forward to rooting for our cinema at the India Pavilion at #Cannes2022, but have sadly tested positive for Covid. Will rest it out. Loads of best wishes to you and your entire team, @ianuragthakur. Will really miss being there.
— Akshay Kumar (@akshaykumar) May 14, 2022