close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बिग बींमुळे विकी, आयुषमानचा आनंद द्विगुणित

हे आहे त्यामागचं मुख्य कारण 

Updated: Aug 15, 2019, 01:10 PM IST
बिग बींमुळे विकी, आयुषमानचा आनंद द्विगुणित

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी पुन्हा एकदा कलाविश्वातील नवोदित अभिनेत्यांच्या कामाची एका सुरेख पद्धतीने प्रशंसा केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाकडून चित्रपट विभागासाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेता आयुषमान खुराना यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्यानंतर या दोन्ही अभिनेत्यांनी या सन्मानाप्रती आनंदाची भावनाही व्यक्त केली. विकी आणि आयुषमानवर त्यांच्या या उपलब्धीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच त्यांचा हा आनंद द्विगुणित झाला. 

अर्थात त्यामागचं कारणंही तसंच होतं. 'अंदाधुन' या चित्रपटात झळकलेल्या आयुषमान आणि 'उरी' या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेता विकी कौशल या दोघांनाही खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनीही शाबसकी दिली. बिग बी आणि त्यांच्या पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी सुरेख असं पत्र लिहित त्यांना शुभाशिर्वाद देत पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या. 

Vicky Kaushal National Award win

आपल्या कामाची अशी दाद देण्याचा बिग बींचा हा अंदाज पाहून विकी आणि आयुषमानचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या शुभेच्छा मिळणंही एखाद्या पुरस्काराहून कमी नाही, अशाच भावना आयुषमानने व्यक्त केल्या. तर, हे सारंकाही माझ्यासाठी जणू सारं विश्वच आहे अशी प्रतिक्रिया विकीने दिली.