अभिनयासोबतच या क्षेत्रातही Vicky 'कौशल', लग्नानंतर समोर आलं गुपित

पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.

Updated: Jan 20, 2022, 04:07 PM IST
अभिनयासोबतच या क्षेत्रातही Vicky 'कौशल', लग्नानंतर समोर आलं गुपित  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त इंदौरमध्ये आहे. अशा परिस्थितीत तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसत आहे.

त्याचे फोटो आणि व्हिडिओ दररोज इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहेत. पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता विकी कौशल क्रिकेट खेळताना दिसत आहे. एका शेतात बरेच लोक उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमसोबत क्रिकेटचा सामना रंगला आहे. विकी फलंदाजी करत असून तो अनेक चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. अभिनयात विकीने आपली क्षमता सिद्ध केली आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्येही त्याचे प्रभुत्व दिसून येते आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याची ही स्टाईल चाहत्यांना फार आवडली आहे. हा व्हिडिओ ख्रिश्चन कॉलेजच्या बाहेरचा आहे, ज्याचा वापर चित्रपटाच्या एका सीनसाठीही करण्यात आला आहे.

विकी 'लुकाछूपी 2' चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदौरमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची कथा इंदौमध्ये घर शोधण्यासाठी झालेल्या संघर्षावर आधारित आहे. येथे त्याच्यासोबत सारा अली खान देखील आहे.