close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुलीच्या वाढदिवशी अर्जुनची भावनिक पोस्ट

अर्जुनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

Updated: Jun 24, 2019, 06:53 PM IST
मुलीच्या वाढदिवशी अर्जुनची भावनिक पोस्ट

मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅबेरिलासोबत असलेल्या नात्याबाबत, त्यांच्या फोटोबाबत सोशल मीडियावरुन नेहमी अॅक्टिव्ह असतो. अर्जुन त्याच्या दोन्ही मुलींसोबतही सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो. नुकतंच अर्जुनने त्याची मुलगी मायरा रामपालच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनची छोटी मुलगी मायरा १४ वर्षांची झाली आहे. या पोस्टसह त्याने एक भावनिक कॅप्शनही दिलं आहे.

अर्जुन त्याच्या मायरा आणि महिका या दोन मुलींशी तो अतिशय जवळ आहे. दोन्ही मुलींसोबतचे फोटो अर्जुन शेअर करत असतो. मायरा आणि महिका या अर्जुन आणि त्याची आधीची पत्नी मेहर जेसिकाच्या मुली आहेत. 

 
 
 
 

A post shared by Arjun (@rampal72) on

गेल्या वर्षी अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिका यांनी आपले २० वर्षांचं नातं तोडत घटस्फोट घेतला होता. परंतु अर्जुनची त्याच्या मुलींशी अतिशय जवळिक आहे. त्यामुळे त्याच्या दोन्ही मुली माहिका आणि मायरा नेहमीच अर्जुनसोबत पाहायला मिळतात. अर्जुनच्या मुली नेहमी मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर असतात.