मुंबई : विनोदी कार्यक्रमांपासून स्वत:चा स्वतंत्र शो आणि त्यानंतर थेट चित्रपटांपर्यंत मजल मारणाऱ्या विनोदवीर अर्थात कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यानं कायमच चाहत्यांना खळखळून हसवलं आहे.
प्रेक्षकांना आनंदाचे क्षण देण्याची जबाबदारी कपिल आणि त्याची टीम मागील कित्येक वर्षांपासून पार पाडत आहे. सर्वाधिक टीआरपी मिळवणारा शो म्हणूनही कपिलच्या शोनं बाजी मारली होती. 2007 पासून सुरु झालेला त्याचा प्रवास आतापर्यंत सुरुच असून या प्रवासात तो प्रत्येक टप्पा मोठ्या कौशल्यानं सर करत आहे.
'द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज' , 'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार्स', 'लाफ्टर नाइट्स', 'कॉमेडी सर्कस का जादू' मध्ये कपिल झळकला होता. आपल्या विनोदी शैलीत प्रसिद्धीझोतात आलेल्या कपिलनं कधी मागे वळून पाहिलं नाही. आज तो कोट्वधींच्या संपत्तीचा मालक आहे.
आताच्या आता थांब नाहीतर....; अभिनेत्रीला क्रूर तालिबानकडून धमकी
सूत्रांच्या माहितीनुसार, 2021 पर्यंत कपिलच्या संपत्तीचा आकडा 282 कोटींवर पोहोचला आहे. कॉमेडी शो आणि चित्रपटांच्या मार्फत त्यांला गडगंज मानधन मिळतं. कपिलच्या मानधनाबबात सांगावं तर, शोसाठी तो 40 ते 90 लाख रुपये घेतो. याशिवाय कैक पुरस्कार सोहळ्यांसाठीही सूत्रसंचालक म्हणून त्याची वर्णी लागली आहे. या माध्यमातूनही त्याला मोठं मानधन देण्यात आलं आहे. त्यामुळं कपिलच्या संपत्तीचा आकडा सातत्यानं वाढत आहे.