अभिनेता गोविंदा यांच्या कारला अपघात

मागून येणाऱ्या एका कारने गोविंदा यांच्या कारला धडक दिली.

Updated: Jun 25, 2020, 09:00 AM IST
अभिनेता गोविंदा यांच्या कारला अपघात
संग्रहित फोटो

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांच्या कारला अपघात झाला आहे. बुधवारी मागून येणाऱ्या एका कारने गोविंदा यांच्या कारला धडक दिली. कारमध्ये गोविंदा यांचा मुलगा यशवर्धन आणि ड्रायव्हर असे दोघेजण होते. 

बुधवारी जुहू येथे रात्री 8.30च्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे. यावेळी कारमध्ये गोविंदा नव्हते. मात्र गोविंदा यांचा मुलगा कारमध्ये होता. कार अपघातात कोणलाही दुखापत झाली नाही. मात्र कारचं काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.