Girlfriend असूनही Hritik पहिल्या पत्नीसोबत आता काय करतोय? या Video वरून तुम्हीच लावा अंदाज

तरी आपल्या मुलांसाठी ते नेहमीच एकत्र येत असतात. 

Updated: Aug 28, 2022, 08:47 PM IST
Girlfriend असूनही Hritik पहिल्या पत्नीसोबत आता काय करतोय? या Video वरून तुम्हीच लावा अंदाज title=

Hritik Roshan and Sussan Khan spotted: हृतिक रोशन आणि सुझान खान ही जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना आजही आनंद होतो. ते दोघेही वेगळे झाले असले तरी आपल्या मुलांसाठी ते नेहमीच एकत्र येत असतात. 

आत्तापर्यंत हृतिक रोशनच्या चाहत्यांना कळलेच आहे की तो अभिनेत्री सबा आझादला डेट करतो आहे. त्यातून आता हृतिक आणि त्याची पहिली पत्नी सुझेन खान एकत्र राहत नसले तरी नुकतेच ते दोघं एका ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. यावरून सगळीकडेच चर्चांना उधाण आले आहे. 

हृतिक आणि सुझानचा हा व्हिडिओ जोरात व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत ते दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. फॅशनच्या बाबतीत दोघंही पुढे आहेत यावेळी ते दोघं ब्लॅक लुकमध्ये दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच चाहते जोरदार कमेंट करत आहेत. काहीजण या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत तर काही जण लूकचे कौतुक करत आहेत.

हृतिक आणि सुझैन यांना हृधन आणि ह्रहान नावाची दोन मुले आहेत. काही दिवसांपूर्वी सुजैन खान तिच्या बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली होती. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हृतिक सबाशी लग्न करणार? - सध्या हृतिक रोशन सबा आझादला डेट करत असून दोघेही लग्नाच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. मात्र दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.