शूटिंगनंतर अभिनेत्याचे व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल

मुंबई विमानतळावर अभिनेत्याला पाहण्यात आलं...

Updated: Sep 14, 2019, 02:56 PM IST
शूटिंगनंतर अभिनेत्याचे व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) गेल्या काही दिवसांपासून आगामी 'अंग्रेजी मीडियम' (Angrezi Medium) चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होता. शुक्रवारी रात्री उशिरा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो भारतात परतला आहे. अशातच इरफानला मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं. विमानतळावर इरफान त्याचा चेहरा लपवताना कॅमेरात कैद झाला.

विमानतळावर इरफानने डोक्यावर टोपी आणि चेहरा कपड्याने बांधलेला होता. तो व्हिलचेयरवर बसलेला पाहण्यात आला. 

irrfan khan
फोटो सौजन्य : Yogen Shah

irrfan khan
फोटो सौजन्य : Yogen Shah

गेल्या वर्षी इरफानने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर झाला असल्याचा खुलासा केला होता. न्यूयॉर्कमध्ये इरफान ट्यूमरवर उपचार घेत होता. उपचारानंतर फेब्रुवारी महिन्यात भारतात परतल्यावर इरफानने स्वत: 'अंग्रेजी मीडियम'च्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

'अंग्रेजी मीडियम'चे दिग्दर्शक दिनेश विजान यांनी इरफान खान 'अंग्रेजी मीडियम'मध्ये साकारत असलेली भूमिका नेहमी आठवणीत राहिल असं म्हटलंय. इरफान खानसोबत करिना कपूरही या चित्रपटात झळकणार आहे. आगामी 'अंग्रेजी मीडियम' चित्रपट २०१७ मध्ये आलेल्या 'हिंदी मीडियम'चा सिक्वल आहे.