अभिनयातून 'आरंभ' अन् आता गायक! त्यांच्या मुंबईतील एका शोचं तिकीट तब्बल 40 हजार रुपये

Entertainment News : काही चेहरे, काही माणसं त्यांच्या येण्यानं वातावरणच बदलतात. कलाकारांच्या गर्दीतलं हे नावही तसंच. तुम्हाला ओळखता येतंय का?   

सायली पाटील | Updated: Aug 10, 2023, 02:01 PM IST
अभिनयातून 'आरंभ' अन् आता गायक! त्यांच्या मुंबईतील एका शोचं तिकीट तब्बल 40 हजार रुपये title=
Bollywood Actor piyush mishra show ballimaran ticket costs 40000 know details

Entertainment News : 'लाहौर के उस
पहले जिले के
दो परगना में पहुँचे
रेशम गली के
दूजे कूचे के
चौथे मकां में पहुँचे
और कहते हैं जिसको
दूजा मुल्क उस
पाकिस्तां में पहुँचे
लिखता हूँ ख़त में
हिन्दोस्तां से
पहलू-ए हुसना में पहुँचे
ओ हुसना.....' हे शब्द तुम्हाला आठवतायत का? किंवा 'आरंभ हे प्रचंड...' हे गाणं आठवतंय का? आठवत असेलच. कारण हे शब्द आपल्या मनावर कायमचे छाप सोडून गेले आहेत. मुळात हे शब्द कोणाचे आहेत माहितीये? 

हा चेहरा तुमच्याही ओळखीचा आहे. किंबहुना गाण्यात येणारा आवाजही तुमच्या ओळखीचा आहे. थोडं आठवून पाहा... अगदी बरोबर मार्गानं उत्तर शोधताय तुम्ही. कारण, हा आवाज आणि हे शब्द आहेत अभिनेता पियुष मिश्रा यांचा. 

गायक, गीतकार, अभिनेता, संगीतकार, पटकथा लेखक अशी चौफेर भूमिका लिलया पेलणारं एक नाव म्हणजे पियुष मिश्रा. व्यासपीठावर जाताच त्याच्यातही जीव ओतणारा हा कलाकार त्याच्या अभिनय कौशल्यामुळं भलताच प्रसिद्ध झाला. 1986 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात एनएसडीमधून पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मिश्रा यांनी हिंदी नाट्यक्षेत्रातून कलाक्षेत्रातील करकिर्दीची सुरुवात केली. पाहता पाहता अभिनयापासून लेखनापर्यंत प्रत्येत क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. 

हेसुद्धा वाचा : शाहरुख खानचा 'स्वदेस' चित्रपट 'या' मालिकेवरुन उचलला? प्रत्येक सीन हुबेहुब; हा Video पाहाच

गुलाल (2009), गँग्स ऑफ वासेपुर - भाग 1 यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची गाणी विशेष गाजली. 2012 च्या MTV Coke Studio मध्ये त्यांनी 'हुस्ना' हे गाणं सादर केलं आणि प्रत्येकानंच डोळे मिटून प्रत्येक शब्दाची अनुभूती घेत मिश्रा यांना उत्सफूर्त दाद दिली. 

स्वतंत्र शो आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद... 

सध्या अभिनय क्षेत्र गाजवणारे पियुष मिश्रा 'बल्लिमारन' (Ballimaran) या Music Show च्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. देशभरात ते साधारण 25 ते 30 शहरांमध्ये जाऊन आपली गाणी प्रेक्षकांसमोर स्वत: सादर करणार आहेत. किंबहुना या कार्यक्रमाला सुरुवातही झाली असून, सध्या त्यांचा हा दौरा मुंबईपर्यंत येऊन पोहोचला आहे. 

खुद्द मिश्रा यांनीच सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्यांच्या या कार्यक्रमाची माहिती दिली. अनेक रसिकांनी ही संधी पाहताच कार्यक्रमासाठीच्या तिकीट बुक केल्या. आश्चर्य म्हणजे त्यांनी 1500 रुपयांपासून थेट 40000 रुपयांपर्यंत तिकीटांचे दर असूनही अनेकांनी या तिकीटी खरेदी केल्या आहेत. ज्यामुळं मिश्रा, त्यांचे शब्द आणि अर्थातच गाणी सादर करण्याची त्यांची शैली या साऱ्याप्रती रसिकांना असणारी आत्मियता कळून येते. 

Bollywood Actor piyush mishra show ballimaran ticket costs 40000 know details

शोसाठीच्या तिकीटांचे दर अनेकांनाच जास्तही वाटत असतील. पण, हरकत नाही, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून त्यांची ही गाणी ऐकू शकता. हो, पण त्यांना प्रत्यक्षात ऐकण्याचा अनुभव एकदातरी घ्याच.