रणवीरच्या '८३' टीमकडून कपिल देव यांना सलाम

'८३' चित्रपटाच्या निर्मात्यांनी कपिल देव यांच्यासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Jan 7, 2020, 01:08 PM IST
रणवीरच्या '८३' टीमकडून कपिल देव यांना सलाम

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या आगामी '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ६ जानेवारी रोजी कपिल देव यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात या महान खेळाडूचा सन्मान करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये '८३' चित्रपटातील कपिल यांना चिअर करतानाचा सीनही दाखवण्यात आला आहे.

'८३' चित्रपट, १९८३ मध्ये वर्ल्ड कपमध्ये झालेल्या भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील रणवीरच्या लुक्सचं सर्वत्र कौतुक होत आहे. रणवीरनेही कपिल देव यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

चित्रपटातील रणवीरच्या लुक्सबाबत कपिल देव यांनी एका न्यूज एजेन्सीशी बोलताना, रणवीरचा लुक पाहून अतिशय आश्चर्यचकित झालो असल्याचं सांगितलं. कपिल देव यांनी मेकअप आर्टिस्टचं कौतुक करत, त्यांनी अतिशय उत्तम काम केल्याची दाद दिली आहे. रणवीरबाबतही बोलताना कपिल यांनी, रणवीरसोबत बराच वेळ घालवला असून, तो माझ्याहून अतिशय वेगळा व्यक्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.

 
 
 
 

A post shared by Kapil Dev (@therealkapildev) on

रणवीरसोबत चित्रपटात त्याची रिअल लाईफ वाईफ, दीपिकाही भूमिका साकारणार आहे. दीपिका कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कबीर खान दिग्दर्शित  '८३' येत्या १० एप्रिल २०२० मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.