close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रणवीरचे ते शब्द ऐकून दीपिका भावूक; 'माझी पत्नी म्हणजे....'

नेहमीप्रमाणेच यावेळीसुद्धा... 

Updated: Sep 20, 2019, 01:42 PM IST
रणवीरचे ते शब्द ऐकून दीपिका भावूक; 'माझी पत्नी म्हणजे....'
रणवीरचे ते शब्द ऐकून दीपिका भावूक; माझी पत्नी म्हणजे....

मुंबई : चित्रपट कला आणि या चित्रपटांच्या झगमगणाऱ्या दुनियेतील एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे आयफा पुरस्कार. या कलेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकार मंडळींचा गौरव या पुरस्कार सोहळ्यातक करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या दिमाखात आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कारांचं यंदाचं हे २०वं वर्ष. ज्यामुळे हे बऱ्याच अंशी खास ठरलं. रणवीरच्या अतरंगी वेशभूषेपासून ते अगदी सलमानसोबत आलेल्या 'त्या' मिस्ट्री गर्लपर्यंत, अनेक कारणांनी हा सोहळा चर्चेत आला. 

यंदाच्या आयफामधील काही लक्षवेधी क्षणांपैकी एका क्षणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांनाच #CoupleGoals देत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ आहेत, रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळतानाचे. 

'पद्मावत' या चित्रपटामध्ये साकारलेल्या खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीला सर्तोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कार जाहीर होताच रणवीर मोठ्या उत्साहात उठून व्यासपीठाच्या दिशेने गेला. शेजारीच बसलेल्या दीपिकानेही त्याला शुभेच्छा दिल्या. 

व्यासपीठावर जाऊन पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं. नेहमीप्रमाणेच यावेळीसुद्धा रणवीरने आपल्या यशाचं श्रेय दीपिकालाही दिलं. 'तिथे पहिल्याच रांगेच माझी पत्नी मोठ्या अभिमानाने बसली आहे याहून आणखी काहीची अपेक्षा मी का करु', असं रणवीर म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून दीपिकाला आनंदाश्रू रोखता आले नाहीत.

दीपिका आपली प्रेरणास्त्रोत असल्याचं म्हणत दर दिवशी ती मला प्रोत्साहन देत असते, असं म्हणणाऱ्या रणवीरने आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे, त्या क्षेत्रात काम करत असल्याचा आनंद व्यक्त केला.