...म्हणून राहतं घर सोडणार सैफ

सैफ येत्या काही दिवसांमध्ये त्याचं राहतं घर सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Updated: Jul 24, 2020, 10:59 AM IST
...म्हणून राहतं घर सोडणार सैफ

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान हे दोघंही लॉकडाऊनच्या काळातही त्यांच्या घराबाहेर पडतानाच दिसत होते. मुळात त्यांचं हे बाहेर पडणं अनेकांच्याच ध्यानातही आलं. कित्येकदा तैमूरही त्यांच्यासोबत असे. तेव्हापासूनच सैफिना नेमके जातात करी कुठं हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. अखेर सावरुन पडदा उचलला गेला आहे.

सैफ येत्या काही दिवसांमध्ये त्याचं राहतं घर सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. एकटा सैफ नव्हे, तर करीना आणि तैमूर या आपल्या कुटुंबासह बॉलिवूडचा हा नवाब या राहत्या घराला लवकरच अलविदा करणार आहे. एका मुलाखतीतत खुद्द सैफनेच याबाबतची माहिती दिली आहे.

सैफिना सध्या राहत असणाऱ्या घराच्या अगदी समोरच त्यांनी नवं घर घेतलं आहे. जेथे ही सेलिब्रिटी जोडी वास्तव्यास जाणार आहे. ज्यानंतर त्यांचं सध्याचं घर हे भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहे.नव्या घराच्या सजावटीचं काम सुरु असल्यामुळ हे सारंकाही सुरळीत सुरु आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी म्हणून सैफ आणि अनेकदा करीनाही त्यांच्या नव्या घरी भेट देत होते. तेव्हा लॉकडाऊनच्या काळातही बाहेर पडण्याचं हे कारण होतं, तर. आपण घराच्या कामात लक्ष घालत असतेवेळी कुटुंबासमवेतचे हे क्षण अतिशय आनंदाद व्यतीत केल्याचं सैफ मुलाखतीदरम्यान म्हणाला. याचवेळी बहीण सोहा अली खान आणि तिचा पती, कुणाल खेमूसुद्धा आपल्या या नव्या घराच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत होते, असं सैफने सांगितलं. इतकंच नव्हे, तर सारा आणि इब्राहिम यांनीही या नव्या घराची पाहणी केली.