सैफ आणि साराविषयीचं हे सिक्रेट जाणून थक्कच व्हाल...

तुम्हाला हे ठाऊक आहे का? 

Updated: Feb 3, 2020, 09:40 AM IST
सैफ आणि साराविषयीचं हे सिक्रेट जाणून थक्कच व्हाल...
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सैफ अली खान Saif Ali Khan हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जवानी जानेमन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. नवोदित अभिनेत्री आणि एकेकाळी गाजलेल्या पूजा बेदी हिची मुलगी अलाया एफ हिच्यासोबत सैफ या चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहे. ज्यामध्ये सैफने तिच्या ऑनस्क्रीन वडिलांची भूमिका साकारली आहे. एकिकडे अलाया आणि सैफचं ऑनस्क्रीन वडील- मुलीचं नातं चर्चेत असतानाच दुसरीकडे सैफची मुलगी सारा Sara Ali Khan हिला हा चित्रपट ऑफर करता येऊ शकला असता अशा चर्चांनीही डोकं वर काढलं आहे. 

सैफच्या खऱ्या मुलीनेच ऑनस्क्रीन मुलीचीही भूमिका साकारावी असा सूर काही चाहत्यांनी आळवला. याच चर्चांवर खुद्द सैफने एका मुलाखतीत काही गोष्टी उघड केल्या आहेत. 'हो आम्हाला एकत्र काम करण्याची संधी आली आहे. आतापर्यंत पाच चित्रपटांसाठी आम्हाला (साराला आणि मला) विचारण्यात आलं होतं. पण, काही कारणास्तव तसं होऊ शकलं नाही. अमुक एक चित्रपट, दोघांसाठीसुद्धा भावणारा असला पाहिजे. त्यामुळे आम्ही जेव्हा केव्हा अशा चित्रपटात काम करु तेव्हा दोघांनाही तो तितकाच उत्साह देणारा ठरला पाहिजे', असं सैफ म्हणाला. 

सहसा कलाकारांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं ही मोठी बाब वाटते. पण, सारा आणि सैफच्या बाबतीत तो क्षण अद्यापही आलेला नाही असंच म्हणावं लागेल. ही बाब कित्येकांना थक्क करत असली तरीही सत्य मात्र हेच आहे. 'ईटी टाईम्स'शी संवाद साधतेवेळी त्याने ही बाब समोर ठेवली. 

'जवानी जानेमन' या चित्रपटासाठी सारालाही विचारण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पण, सैफच्या सांगण्यावरून तिने हा चित्रपट न स्वीकारल्याचीही चर्चा आहे. त्याऐवजी साराने 'सिंबा' या चित्रपटाचा स्वीकार करत या कलाविश्वात स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. 

विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

साराला मी एखाद्या चित्रपटात तेव्हाच निवडू इच्छितो जेव्हा तिला माझ्या मदतीची गरज असेल. पण, खरं सांगू तर तिची वाट ही वेगळीच हवी. ती आता ज्या कलाकारांसोबत काम करत आहे, त्यांच्यासोबतच तिने काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण याबाबत गोंधळ न घातलेलाच बरा, असं सैफने स्पष्ट केलं.