हो गया ना अभी; सलमान चारचौघांत कोणावर भडकला ?

मग काय कपाळावर आठ्या आणत एकावर तो चिडला. 

Updated: Feb 28, 2022, 02:22 PM IST
हो गया ना अभी; सलमान चारचौघांत कोणावर भडकला ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : यारों का यार, भाईजान, सल्लू, वगैरे वगैरे... सलमानची ओळख करायची तर यातील कोणताही शब्द त्याला लागू होतो. पण, तुम्हाला माहितीये का या भाईजान संतापतो तेव्हा नेमकं काय़ होतं? गावचा वळसा न घेता थेट मुद्द्यावर येऊन सांगावं तर, सलमान नुकताच त्याच्या 'दबंग टूर' वरून मायदेशी परतला. (SALMAN KHAN)

सहाजिकच सलमान येणार असल्याचं कळताच तिथे बघ्यांची आणि छायाचित्रकारांची एकच गर्दी झाली. 

बस्स, मग काय कपाळावर आठ्या आणत तिथे फोटो काढणाऱ्यांपैकीच एकावर तो चिडला. हो गया ना.... असं नाराज होत तो बोला काय आणि सर्वांनीच त्याला जाण्यासाठी वाट दिली काय. 

का संतापला सलमान? 
राहिला मुद्दा त्याला राग का आला, यासंबंधीचा तर सहसा सलमान किंवा इतर सेलिब्रिटी विमानतळावरुन गेट B मधून बाहेर येतात. इथून त्यांच्या कारपर्यंतचं अंतर कमी असतं. 

सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी सलमानला B ऐवजी गेट A मधून बाहेर येण्याची विचारणा केली गेली. ज्यामुळं त्याला अपेक्षेहून जास्त अंतर विमातळार चालावं लागलं. 

पुढे काय, हीच बाब सलमानला संताप देऊन गेली आणि त्याचा राग तिथं असणाऱ्या छायाचित्रकारांवर निघाला. 

एरव्ही खेळीमेळीनं वागणारा सलमान असा संतापलेला पाहून काही क्षणांसाठी तिथं असणाऱ्यांनाही धक्काच बसला होता.