वडिलांनी दुसऱ्या पत्नीला घरी आणताच काय होती सलमानची प्रतिक्रिया?

अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान हे हिंदी कलाविश्वातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. पण, त्यांच्या खासगी आयुष्यावरही बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. विवाहित आणि चार मुलांचे वडिल असतानाही सलीम यांनी हेलन यांच्यासोबतचं नातं पुढे नेत त्यांच्याशी लग्न केलं. 

Updated: Oct 26, 2021, 02:19 PM IST
वडिलांनी दुसऱ्या पत्नीला घरी आणताच काय होती सलमानची प्रतिक्रिया?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान हे हिंदी कलाविश्वातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. पण, त्यांच्या खासगी आयुष्यावरही बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. विवाहित आणि चार मुलांचे वडिल असतानाही सलीम यांनी हेलन यांच्यासोबतचं नातं पुढे नेत त्यांच्याशी लग्न केलं. 

लग्न केल्यानंतर आपल्या दुसऱ्या पत्नीला घेऊन ते घरीसुद्धा आले. आपल्या वडिलांनी दुसरं लग्न केलं असून, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीला घेऊन घरीच आले आहेत हे पाहिल्यानंतर सलमानची जी प्रतिक्रिया होती ती त्याच्या वडिलांच्याही स्मरणात आहे. 

काही माध्यमांमध्ये यासंदर्भातील खुलासा करण्यात आला. 

'ती (सलमान आणि त्याची भावंड) मुलं होती, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया ही रागीट अशीच होती. आई जे करत होती, तेच मुलंही करत होती. त्यावेळी सलमानंही हेलनसोबतचं माझं नातं स्वीकारलं नव्हतं, त्याचप्रमाणे मुलंही तिचा राग करत होती', असं सलीम खान म्हणाले होते. 

त्यावेळी हेलन यांच्याशी घरी कोणीही बोलत नव्हतं, असंही त्यांनी सांगितलेलं. यामध्ये सलमानचाही समावेश होता. 

असं म्हटलं जातं की, सलीम यांच्या दुसऱ्या लग्नाने सलमा यांना हादरा बसला होता. एक प्रकारे आपली फसवणूक झाली आहे, अशीच भावना त्यांच्या मनात घर करुन गेली होती. 

ज्या व्यक्तीवर त्यांनी जिवापाड प्रेम केलं, विश्वास ठेवला त्याच व्यक्तीकडून सलमा यांना अशी वागणूक मिळाल्यामुळं त्यांना धक्का बसला होता.