Salman Khan Body Double Sagar Pandey Death: सलमान खानच्या चाहत्यांसाठी नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडे याचे आज 30 सप्टेंबर रोजी अचानक निधन झाले. 1999 पासून सलमान खानच्या चित्रपटांमध्ये तो बॉडी डबल म्हणून काम करत होता. समोर आलेल्या माहितीनुसार त्याचे वय 45-50 एवढे असावे. (bollywood actor salman khan's body double sagar pandey dies due to cardic arrest)
समोर आलेल्या माहितीनुसार सागर जिममध्ये वर्क आऊट करत असताना अचानक कोसळला. त्याला तात्काळ जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महापालिका रुग्णालयात नेण्यात आले.परंतु तिथेच त्याला मृत घोषित करण्यात आले. प्रशांत यांनीच दिलेल्या माहितीनुसार सागर हे शरीरानं तंदूरूस्त होते परंतु त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
एप्रिल 2020 मध्ये लॉ़कडाऊनमुळे सागरची आर्थिक परिस्थिती फार खराब होती. लॉकडाऊन दरम्यान काम बंद झाल्यामुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सागरच्या कमाईचे स्त्रोत हे अभिनय आणि स्टेज शोचं होते परंतु लॉकडाऊनमुळे सर्वच चित्रपटांचे शूटिंग ठप्प झाले आणि कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. सागर आपल्या पाचही भावांचा खर्च उचलायचे.
Salman Khan’s body double dies: Sagar Pandey dies while doing gym in Mumbai, was working with Salman for 23 years https://t.co/pxe3dpUycw
— Süñňý Srîvåstãv (@AnkurSr19101901) September 30, 2022
कोण होता सागर पांडे?
सागर हा प्रतापगढ उत्तर प्रदेशचा आहे जो काही वर्षांपूर्वी हिरो बनण्यासाठी मुंबईत आला होता. जेव्हा त्याला चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही तेव्हा त्याने बॉडी डबल म्हणून काम करायला सुरुवात केली. कुछ कुछ होता है (1998) हा पहिला चित्रपट होता ज्यात त्याने सलमान खानच्या बॉडी डबल भूमिका केली होती. नंतर त्याने बजरंगी भाईजान (2015), ट्यूबलाइट (2017), दबंग (2010), दबंग 2 (2012), दबंग 3 (2019) इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सागर पांडेने 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बॉडी डबल म्हणजे काय?
चित्रपटात स्टंटबाजी दाखवण्यासाठी सुपरस्टारच्या डुप्लिकेटची नियुक्ती केली जाते. हे बॉडी डबल म्हणून ओळखले जातात.