मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) या जोडीकडे 'मोस्ट हॅपनिंग कपल' म्हणून पाहिलं जातं. काही वर्षांपूर्वी अनेक महिला चाहत्यांची मनं तोडत शाहिदनं मीराशी लग्न केलं आणि पाहता पाहता तिलाही चाहत्यांनी आपलंसं केलं. (Bollywood Actor shahid kapoor wife mira rajput kissed him video viral)
कलाजगताशी थेट संबंध नसतानाही शाहिदची पत्नी झाल्यानंतर मीरा बरीच बदलली. हल्ली तर ती मॉडेलिंग वगैरेही करताना दिसते. अशी ही मीरा प्रत्येक पावलावर शाहिदची साथ देताना दिसते.
जीवनातील प्रत्येक चढउतारात त्याला तिची साथ मिळते. एवढंच काय, तर जाहीरपणे प्रेम व्यक्त करण्यापासूनही मीरा मागेपुढे पाहत नाही. आतापर्यंत बऱ्याचदा मीरा आणि शाहिदच्या नात्याचे रोमँटिक क्षण चाहत्यांनी पाहिले आहेत.
सोशल मीडियावरही त्यांच्या अकाऊंटवरून याची झलक सातत्यानं पाहायला मिळते. त्यातच भर टाकणारा एक व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून आणि शाहिदला एकाएकी Kiss करणाऱ्या मीराला पाहून नेटकरी तिला, 'रुको जरा, सबर करो' असा सल्ला देताना दिसत आहेत.
शाहिदच्या बहिणीच्या लग्नातील हे खास क्षण जेव्हा एका समारंभादरम्यानच मीरानं शाहिदला जवळ घेत त्याच्या ओठांवर किस केलं. ती असं काही करेल याची शाहिदलाही कल्पना नसल्यामुळं त्याची प्रतिक्रियाही पाहण्याजोगी आहे. बी टाऊनच्या या Power Couple ची केमिस्ट्री अनेकांनाच भावलीही आहे.