ना चित्रपट, ना जाहिरातींमधून कमाई, तरीही आर्यन खानने खरेदी केले 37 कोटींचे दोन फ्लॅट; शाहरुखच्या शेजारीच घेतलं घऱ

 Aryan Khan Income Source: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) दिल्लीत जिथे वास्तव्यास आहे तिथेच आता त्याचा मुलगा आर्यन खानने (Aryan Khan) संपत्ती खरेदी केली आहे. आर्यन खानने दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये दोन आलिशान फ्लॅट खरेदी केली असून त्यासाठी 37 कोटी रुपये मोजले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 29, 2024, 06:53 PM IST
ना चित्रपट, ना जाहिरातींमधून कमाई, तरीही आर्यन खानने खरेदी केले 37 कोटींचे दोन फ्लॅट; शाहरुखच्या शेजारीच घेतलं घऱ title=

Aryan Khan Bought Property in Delhi: बॉलिवूचा बादशाह शाहरुख खानचा (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खानने ( Aryan Khan) दिल्लीत महागडी संपत्ती खरेदी केली आहे. आर्यन खानने दिल्लीमधील उच्चभ्रू परिसरात दोन आलिशान फ्लॅट्स खरेदी केले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानने दक्षिण दिल्लीच्या पंचशील पार्कात दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. या आलिशान घरांसाठी त्याने 37 कोटी मोजले आहेत. आर्यनच्या या घरांचा सौदा 2024 मध्ये झाला आहे. यासाठी त्याने करोडो रुपयांचा टॅक्सही भरला आहे. दिल्लीचा हा परिसर राजधानीतील सर्वात महागड्या निवासस्थानांपैकी आहे. 

शाहरुख आणि गौरी जिथे राहतात, तिथेच आर्यनने खरेदी केला फ्लॅट

आर्यन खानने ज्या इमारतीतील दोन फ्लॅट खरेदी केले आहेत, तेथील बेसमेंट आणि तळमजला गौरी आणि शाहरुख खानच्या मालकीचा आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये शाहरुख खान आणि गौरी दिल्लीमधील याच घरी वास्तव्यास होते. आता आर्यन खानने त्याच इमारतीत फ्लॅट खरेदी केले आहेत. आर्यन खानने मे 2024 मध्ये या फ्लॅट्ससाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून 2 कोटी 66 लाख भरले आहेत. 

आर्यन खानची आई गौरी खानच या दोन्ही फ्लॅट्सचं इंटिरिअर डिझाईन करणार असल्याचं समजत आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीच्या उच्च्रभ्रू वस्ती गुलमोहर पार्कमधील घर 23 कोटींमध्ये विकलं. 

आर्यन खान नेमकं काय करतो?

शाहरुख आणि गौरी खानचा मोठा मुलगा आर्यन खानने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून आपलं शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबईत परतल्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये डबिंग केले. याशिवाय त्याने बालकलाकार म्हणूनही काम केलं. 2022 मध्ये त्याने लक्झरी फॅशन ब्रँड D'yavol लाँच केले. अलीकडेच त्याने त्याचा ओटीटी डेब्यू प्रोजेक्ट पूर्ण केला आहे.

आर्यन खानची संपत्ती किती?

आर्यनचा लक्झरी लाइफस्टाइल ब्रँड त्याचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार Leti Blagorva आणि बंटी सिंग यांच्यासोबत लाँच केला आहे. शाहरुख खान त्याच्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. ही कंपनी खूप महागडे कपडे बनवते. याशिवाय आर्यनने त्याचा व्होडका ब्रँडही लाँच केला आहे. आर्यन खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे स्वतःची कोट्यवधींची संपत्ती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यनकडे जवळपास 80 कोटी रुपयांची संपत्ती आहे.