सुशांतसह झळकलेल्या अभिनेत्रीची मुंबईतून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाली...

यामागे नेमकं कारण काय...  

Updated: Jul 5, 2020, 09:01 AM IST
सुशांतसह झळकलेल्या अभिनेत्रीची मुंबईतून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाली...
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिह राजपूत याच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री संजना सांघी हिच्या सोशल मीडिया पोस्ट गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच प्रकाशझोतात आल्या आहेत. 'दिल बेचारा' हा तिचा पदार्पणाचा चित्रपट. सुशांत सिंह राजपूतसह ती यामध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपट अतिशय वेगळ्याच आणि अनपेक्षित वातावरणात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज असतानाच संजनानं मुंबईतून काढता पाय घेताना एक पोस्ट लिहिली, ज्यानंतर तिनं हे शहर कायमस्वरुपी सोडल्याच्याही चर्चा रंगल्या. 

तिची पोस्ट याचेच संकेत देत होती. पण, मुळात परिस्थिती मात्र काही वेगळीच होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकारांच्या चौकशीचं सत्र पोलिसांनी सुरु केलं. ज्याअंतर्गत संजनाचीही चौकशी झाली. ज्यानंतर तिनं इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, 'खुदा हाफिज मुंबई. चार महिन्यांनंतर तुझं दर्शन झालं. मी आता परत चालले दिल्लीला', असं म्हणत तिनं मुंबईचं बदललेलं चित्र, तिच्या मनातील कोलाहल आणि परत येण्याबाबत संभ्रमच असचल्याच्या भावनांना शब्दांच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली. 'मिलते है शायद... या नही' या तिच्या ओळी खूप काही बोलून गेल्या. 

संजना मुंबई सोडत असल्याच्या चर्चांनी जोर धरताच अखेर सत्य सर्वांसमोर आलं. खुद्द संजनानंच या शंका दूर करत आपल्या पोस्टबाबत गैरसमज करुन घेतला असल्याचं स्पष्ट केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिनं मुंबईतून काढता पाय घेतल्याचं सांगितल. शिवाय हा कायमस्वरुपी अलविदा नसल्याचंही ती म्हणाली. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर संजना पुन्हा एकदा या शहराची वाट धरणार आहे. 

sanjana

सुशांतला ती म्हणतेय... 

संजनानं सोशल मीडियावर सुशांतसोबतचा एक फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनवाटे त्या दोघांचं ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन नातं सर्वांपुढे ठेवलं. 

 

'तुझ्या सर्व वाईट विनोदांवर मला खळखळून हसायचं आहे, इतकं की माझं पोट दुखू लागेल. हॅम ऍण्ड चीज, चीज ऑम्लेट जास्त कोण खाणार याची स्पर्धा मला तुझ्यासोबत लावायची आहे. जास्त चहा कोण पितं हे मला पाहायचं आहे', असं म्हणत चित्रपटाच्या एका दृश्यापासून, पुस्तकं आणि खाण्यापिण्याच्या सवयींपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक मित्र आणि सहकलाकार म्हणून सुशांतसोबत असणारं सुरेख नातं तिनं सर्वांपुढे ठेवलं.