विकी कौशलने जर हे पूर्ण दुकानं पाहिलं, तर तो चहावाल्याच्या कानाखाली 'वाफ' काढेल

कतरिना-विकी कौशल विवाहबद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे.  

Updated: Dec 10, 2021, 09:19 PM IST
विकी कौशलने जर हे पूर्ण दुकानं पाहिलं, तर तो चहावाल्याच्या कानाखाली 'वाफ' काढेल title=

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लग्नबंधनात अडकले. या दोघांचा विवाह सोहळ्याची एकच जोरदार चर्चा झाली. मोठ्या थाटामाटात दोघांचा विवाह सोहळा पार पडला. यानंतर विकी आणि कतरिना या दोघांनीही लग्नाचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले. यानंतर या दोघांच्या लग्नावरुन एकापेक्षा एक मीम्स आणि  व्हायरल होत आहेत.  यामध्ये एका चहावाल्याचा फोटोही प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोमागे थेट सलमान खानचा कनेक्शन आहे. हा फोटो जर विकी कौशलने पाहिला तर तो नक्कीच या चहावाल्याच्या कानाखाली 'वाफ' काढेल. (bollywood actor vicky kaushal actress katrina kaif wedding sudhir tea shop photo viral on social media connection to salman khan)

हा व्हायरल झालेला फोटो नेमका कुठला आहे, याबाबत नक्की माहिती नाही. मात्र या चहा टपरीवर असलेल्या एका वाक्यामुळे हा सुधीर चायवाला चांगलाच व्हायरल झाला आहे. या चहा टपरीवर 'सलमानने कहा केटरिना के कान में, चलो चाय पिते हे सुधीर के दुकान में' असा मेसेज लिहिलेला आहे. 

या फोटोवरुन नेटकरी सलमान आणि कतरिना कनेक्शन जोडत हा फोटो व्हायरल करत आहेत. कधी काळी सलमान आणि कतरिनाही रिलेशनमध्ये असल्याचं  म्हंटलं जात होतं.