प्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, लाँगटाईम गर्लफ्रेंडसोबत लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर

सध्या सर्वत्र लग्नाचाच सीझन सुरू आहे. तुमच्या मित्रमैत्रीणींपासून ते अगदी आजूबाजूला कोणाचे ना कोणाचे लग्न ठरलं आहे.

Updated: Dec 1, 2021, 05:18 PM IST
प्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, लाँगटाईम गर्लफ्रेंडसोबत लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर

मुंबई : सध्या सर्वत्र लग्नाचाच सीझन सुरू आहे. तुमच्या मित्रमैत्रीणींपासून ते अगदी आजूबाजूला कोणाचे ना कोणाचे लग्न होणार आहे. असंच वातावरण बॉलिवूडच्या जगात देखील आहे. येथे काही सेलिब्रिटींच नुकतच लग्न झालं आहे, तर काही सेलिब्रिटी लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याने स्वत: आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत सांगितली माहिती.

'मुक्काबाज' सिनेमातील अभिनेता विनीत कुमार सिंगने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण (long term Girlfriend) रुचिरा गोरमेरेसोबत लग्न केले आहे. विनीतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे दोन सुंदर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

विनीत आणि रुचिरा यांचे 29 नोव्हेंबर रोजी लग्न झाले होते, पण त्यांनी आज ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेत्याने आपल्या लग्नाचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत विनीत आणि त्याची पत्नी अग्नीच्या समोर बसले आहेत आणि दुसऱ्या फोटोत दोघेही एकत्र उभे राहून पोज देत आहेत.

फोटो शेअर करताना अभिनेत्याने गोंडस कॅप्शनमध्ये लिहिले आहे.  "29/11/2021... तुझा हात धरून मी इथपर्यंत आलो आहे. रुचिरा तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. इतके प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रुचिरानेही याच कॅप्शनसह हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. विनीत आणि रुचिराच्या फोटोंवर कमेंट करत त्यांचे सेलिब्रिटी मित्र त्यांचे अभिनंदन करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विनीत आणि रुचिरा 8 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. एका न्यूज पोर्टशी बोलताना विनीत म्हणाला होता की, या संपूर्ण प्रवासात रुचिराने त्याला खूप साथ दिली आहे. हे लोक गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये लग्न करणार होते, पण कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना लग्न पुढे ढकलावे लागले. ज्यानंतर हे कपल 29 नोव्हेंबरला अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.