वादाची ठिणगी; लग्नानंतर आलियाचं नणंद करिनाशी बिनसलं?

आलियासमोर तिच्या नणंदेचं नाव घेताच तिनं दिलेली प्रतिक्रिया काहीशी प्रश्न उपस्थित करणारी आहे.   

Updated: May 7, 2022, 04:50 PM IST
वादाची ठिणगी; लग्नानंतर आलियाचं नणंद करिनाशी बिनसलं?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी लग्न करत सहजीवनाची सुरुवात केली. लग्न होताच आलियाची तिच्या सासरच्यांकडून बरीच प्रशंसा करण्यात आली. पण, आता म्हणे आलियासमोर तिच्या नणंदेचं नाव घेताच तिनं दिलेली प्रतिक्रिया काहीशी प्रश्न उपस्थित करणारी आहे. 

काही वर्षांपूर्वीची ही घटना, जेव्हा एका टॉक शो मध्ये आलियाला दिग्दर्शक इम्तियाज अली यानं करिनाशी तुलना होण्याबाबतचा प्रश्न विचारला. (Alia bhatt Kareena kapoor Ranbir kapoor)

तू करिनासारखीच आहेस असं अनेकदा म्हटलं जातं..... असं इम्तियाजनं तिला विचारलं. त्यावर उत्तर देत आलिया काहीशी संतापत म्हणाली, 'मी करिनाची नक्कल करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. असं असू शकतं की, शनाया (स्टूडंट ऑफ द ईयर मधील आलियाची भूमिका) आणि पू (कभी खुशी कभी गम मधील करिनाची भूमिका) यांमध्ये साम्य असू शकतं.

मी हे सांगतेय, की मी करिनाची मोठी चाहती आहे आणि कायमच राहीन. पण, मी तिची नक्कल नाही करत. कोणी तिची नक्कल केल्यास मलाच राग येतो, मग मी कशी तिची नक्कल करेन?'. 

इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे, आलियानं केलेलं वक्तव्य हे सध्या केलेलं नसून, काही वर्षांपूर्वीचं आहे. पण, एक अभिनेत्री म्हणून दुसऱ्या अभिनेत्रीशी चुकीच्या पद्धतीनं होणारी तुलना कोणही खपवून घेणार नाही हेच आलियाच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं होतं.