मंडपात येणाऱ्या 'या' सेलिब्रिटी वधूला अश्रू अनावर; Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

सेलिब्रिटी वधू लग्नासाठी मंडपात एंट्री मारताना दिसत आहे

Updated: Nov 23, 2021, 02:28 PM IST
मंडपात येणाऱ्या 'या' सेलिब्रिटी वधूला अश्रू अनावर; Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड कलाकारांची लग्न आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येणारे या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ कायमच चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरतात. सुरेख अशी सजावट, भावभावनांची सांगड आणि बरंच काही या साऱ्याचीच झलक यातून पाहायला मिळते. 

सध्या अशाच एका विवाहसोहळ्यातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये सेलिब्रिटी वधू लग्नासाठी मंडपात एंट्री मारताना दिसत आहे. 

तिची ही एंट्री पाहून अनेकांच्याच डोळ्याच्या कडा पाणावत आहेत. 

ही सेलिब्रिटी वधू आहे अनुष्का रंजन. जिचा नुकताच अभिनेता आदित्य सील याच्याशी विवाह झाला. 

अनुष्काच्या गर्ल गँगने म्हणजेच तिच्या खास मैत्रिणींनी यावेळी मोठ्या सुरेख पद्धतीने तिला मंडपापर्यंत आणलं. यावेळी तिला मंडपापर्यंत आणताना अनेक भावना दाटून आल्याचं दिसलं. 

अनुष्काच्या मनात याक्षणी अनेक भावना दाटून आल्या होत्या. अखेर त्या आसवांवाटे व्यक्त झाल्या. 

आपल्या वधूला इतकं अद्वितीय रुपात पाहून आदित्यचा उत्साह आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदही खूप काही सांगून गेला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anush (@anushkaranjan)

अनुष्कानं पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहता आपणंही अनुभवलेल्या अशाच एखाद्या क्षणाची नकळतच आठवण होत आहे. तुम्ही पाहिला का, हा व्हिडीओ?