स्वित्झर्लंडमध्ये 'विरुष्का'ला खास मित्र भेटले आणि....

सरत्या वर्षाचे शेवटचे दिवस अतिशय आनंदात व्यतीत करण्यासाठी ही जोडी.... 

Updated: Dec 30, 2019, 09:29 AM IST
स्वित्झर्लंडमध्ये 'विरुष्का'ला खास मित्र भेटले आणि....
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कामाच्या व्यापातून वेळ काढत स्वत:च्या जीवनातील खास व्यक्तींना आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याकडे अनेकांचा कल असतो. क्रीडापटू असो किंवा कोणी सेलिब्रिटी किंवा मग एखादी सर्वसामान्य व्यक्ती. कामाच्या व्यापात साऱ्यांनात उसंत देणारे हे क्षण म्हणजे कुटुंब आणि आप्तजनांसोबतची सुट्टी. सध्या अशाच सुट्टीवर गेली आहे, सेलिब्रिटी जोडी अर्थात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. 

क्रिकेट विश्व गाजवणारा विराट सध्या त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडीने सोशल मीडियावर त्यांच्या या खास क्षणांचे फोटोही शेअर केले. अतिशय सुरेख आणि बर्फाच्छादित प्रदेशामध्ये विरुष्काची ही धमाल सुरु असतानाच त्यांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला आहे. 

परदेशात असतानाच या सेलिब्रिटी जोडीला खास मित्र भेटले आहेत. ज्यांच्यासोबतचे फोटोही अनुष्काने शेअर केले. विराट आणि अनुष्काला भेटलेले हे खास मित्र म्हणजे अभिनेता वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल. वरुणही सध्या त्याच्या प्रेयसीसोबत स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्याचवेळी त्याला तेथे विराट आणि अनुष्काची भेट घडली. सोशल मीडियावर या क्षणाचे फोटो पोस्ट करत अनुष्का आणि वरुणने चाहत्यांना या भेटीबद्दल जणू माहितीच दिली. 

 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

फक्त विरुष्का, वरुण - नताशाच नव्हे तर आणखीही काही सेलिब्रिटी सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहेत. यामधीलच एक कुटुंब म्हणजे करीना कपूर खान हिचं. करीना कपूर खान, करिष्मा कपूर आणि सैफ अली खान ही कलाकार मंडळी सुट्टीच्या निमित्ताने सातासमुद्रापार स्वित्झर्लंडमध्ये धमाल करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. मुख्य म्हणजे त्यांच्यासोबतही वरुणचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.