मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहली याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं 2021 मध्येच जानेवारी महिन्यात एका गोड मुलीला जन्म दिला.
वामिका असं अनुष्का आणि विराटच्या मुलीचं नाव. अद्यापही अनुष्कानं लेकिचा चेहरा सर्वांसमोर आणला नसला, तरीही तिनं विविध पद्धतींनी या चिमुकलीला सर्वांच्या भेटीला आणलं आहे.
अनुष्कानं कायमच तिची प्रत्येक भूमिका अधिक स्पष्टपणे सर्वांपुढे मांडली. एक आई म्हणून महिलेच्या मनात नेमकी किती घालमेल असते याचाही उलगडा तिनं एका मुलाखतीत केला.
गरोदरपणादरम्यान, एका महिलेच्या शरीरात अनेक बदल होत असतात. याच बदलांबाबत तिनं मनमोकळेपणानं वक्तव्य केलं.
महिलांवर गरोदरपणानंतरही चांगलं दिसण्याचा दबाव असतो. मला स्वत:च्याच शरीराठी द्वेष तर होणार नाही ना, याची भीती होती. आधी होतं, तर माझं शरीर गरोदरपणानंतर नव्हतं, मी त्या दिशेनं काम सुरु केलं आधीसारखीच दिसू इच्छिते, असं सारं मनात सुरु होतं.
पण, आता मात्र मी जशी आहे तशीच आनंदात आहे असं अनुष्कानं स्पष्ट केलं. जुने फोटो पाहून, मी आधी होते तशीच चांगली होते असं म्हणत मी मन हताश करत नाही असं अनुष्का म्हणाली.
एका महिलेची मानसिकता तिनं अतिशय सुरेखपणे सर्वांपुढे मांडली आणि वेगळाच दृष्टीकोन सर्वांपुढे ठेवला. जे गेलं त्यासाठी हताश न होता आपल्याकडे जे आहे त्यातच समाधानी राहण्याची तिची ही वृत्ती इथे सर्वांची मनं जिंकून गेली.