अनुष्काला विकी- कतरिनाबद्दल नेमकं काय खटकतंय?

लग्नाची बातमी आली अन् त्याच्याच दुसऱ्या क्षणाला

Updated: Dec 10, 2021, 12:24 PM IST
अनुष्काला विकी- कतरिनाबद्दल नेमकं काय खटकतंय?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुरुवारी जयपूरमधील फोर्ट बरवारा येथील सिक्स सेन्सेस या रिसॉर्टमध्ये या जोडीनं एका नव्या अशा सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली. ज्यानंतर सर्वच सेलिब्रिटींनी या नव्या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 

विकी आणि कतरिनाने लग्नगाठ बांधताच दीपिकापासून अनुष्कापर्यंत सर्वांच्याच नजरा त्यांच्या फोटोंवर वेधल्या गेल्या.

अनुष्कानं कतरिना - विकीला शुभेच्छा दिल्या. पण, या शुभेच्छांसोबतच तिनं अशा गोष्टीचा खुलासा केला जे पाहता तिला ही बाब खटकतेय की काय, असाच प्रश्न चाहत्यांना पडला. 

विकी- कतरिनाच्या लग्नातील फोटो पोस्ट करत अनुष्कानं लिहिलं, 'तुम्हा दोघांनाही खुप सारं अभिनंदन, तुम्हाला आयुष्य़भराच्या साथीसाथी शुभेच्छा, प्रेम आणि समजुतदारपणासाठीही शुभेच्छा. 

Katrina -Vicky wedding : कतरिनाच्या लेहंग्यापासून विकीच्या फेट्यापर्यंत; ऐकावं ते नवलंच 

 

बरं, मला यासाठीही आनंद होतोय की तुम्ही लग्न केलं आहे. कारण, आता तुम्ही या नव्या घरात राहायला येऊ शकता आणि आम्हाला बांधकामाचा आवाजही येणार नाही.'

अनुष्कानं ही पोस्ट शेअर करत या दोघांना त्यात मेंशनही केलं. इतकंच नव्हे तर इतक्या दिवसांपासून कॅट आणि विकी अनुष्काचे शेजारी होण्याच्या चर्चांवरही तिनं शिक्कामोर्तब केलं. 

दरम्यान, आता विकी आणि कॅट त्यांच्या या नव्या घरात नेमके कधी राहायला जातात आणि सेलिब्रिटी वर्तुळातील हे नवे शेजारी सर्वांसमोर एकत्र केव्हा येतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल.