हिरवे डोळे, रोखलेली नजर; भल्याभल्या अभिनेत्यांवर मात करतोय अर्चना पूरण सिंगचा मुलगा

सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत असतानाही या अभिनेत्रीनं आपली वेगळी छाप चाहत्यांवर सोडली.   

Updated: Sep 13, 2021, 07:35 PM IST
हिरवे डोळे, रोखलेली नजर; भल्याभल्या अभिनेत्यांवर मात करतोय अर्चना पूरण सिंगचा मुलगा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री आणि 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) यांनी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांसाठी कायमच मनोरंजनाची पर्वणी ठरल्या आहेत. सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत असतानाही या अभिनेत्रीनं आपली वेगळी छाप चाहत्यांवर सोडली. 

सध्या अर्चना पूरण सिंग चर्चेत आल्या आहेत ते म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा आयुष्यमान सेठी याच्यामुळं. आर्यमान आणि आयुष्मान अशी दोन मुलं असणाऱ्या सुपरमॉम अर्चना याच मुलांमुळं प्रकाशझोतात आल्या आहेत. 

आयुष्मान कधीकधी 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमामध्ये येतो आणि आपल्या आवडीच्या कलाकारांसोबत संवादही साधताना दिसतो. सोशल मीडियावरही तो बऱ्यापैकी सक्रिय आहे. आयुष्माननं पोस्ट केलेल्या अनेक फोटोंमध्ये त्याच्या रुपाची प्रशंसा करणाऱ्यांची संख्या अमाप आहे. 

हिरवी छटा असणारे त्याचे डोळे आणि रोखलेली नजर पाहून अनेक फिमेल फॅन्सनी चक्क 'हाए... किन्ना सोणा है... ये' अशा कमेंटही केल्या आहेत. आयुष्मान सहसा प्रसिद्धीझोतापासून दूरच राहणं पसंत करतो. पण, सोशल मीडियामुळे त्याच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसते. 

Ayushmaan Sethi is very close to his mother

 

कपूर, खन्ना, खान, बच्चन अशा अनेक कुटुंबातील स्टारकिड्स कायमच प्रकाशझोतात असतात. काहीजण चित्रपट जगतातही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात, तर काहींना आई- वडिलांच्या प्रसिद्धीमुळंही ओळख मिळून जाते. अशाच काही स्टार किड्सच्या यादीत सध्या आयुष्मानचंही नाव पुढे आलं आहे.