Bollywood Quiz : अभ्यास करताना रडणारी चिमुरडी आज आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री,ओळखेल तो सिकंदर

Bollywood Actors Childhood Photos : बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (photo viral on social media) होतो आहे. या फोटोमधील चिमुरडी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री (Famous actress in Bollywood) आहे. या फोटोमधील चिमुरडी आईसोबत अभ्यास करताना रडताना दिसतं आहे.   

Updated: Nov 4, 2022, 09:47 AM IST
Bollywood Quiz : अभ्यास करताना रडणारी चिमुरडी आज आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री,ओळखेल तो सिकंदर title=
Bollywood Actress Childhood Photo Fatima Sana Shaikh nmp

Famous Bollywood Actress Studying With Mother Photo : बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्रीसंदर्भात (Bollywood actors and actresses) जाणून घ्यायला सर्वसामान्यांना खूप आवडतं. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांचं आयुष्य कसं होतं, ते कॉलेजमध्ये असताना काय करायचे, कसे दिसायचे...अगदी बालपणी (Childhood Photos) ते कसे दिसायचे हे जाणून घ्यायला चाहत्या वर्ग उत्सुक असतो. त्यात जर त्यांचे कधी न पाहिलेले फोटो जर पाहिला मिळाले मग काय मस्तच...बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (photo viral on social media) होतो आहे. या फोटोमधील चिमुरडी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री (Famous actress in Bollywood) आहे. या फोटोमधील चिमुरडी आईसोबत अभ्यास करताना रडताना दिसतं आहे. 

Bollywood Unseen Photos :

ओळखता आलं का तुम्हाला ही अभिनेत्री कोण आहे ते. ओळखल्यास तुम्ही नक्की तिचे जबरदस्त फॅन आहात...या अभिनेत्रीने आमिर खानसोबत काम केलं होतं आणि तो चित्रपट चांगलाच गाजला होता. आता तरी ओळखता आलं का? चला अजून एक हिन देतो आम्ही या फोटोमधील अभिनेत्रीने 'चाची 420' (Chachi 420) या चित्रपटमध्ये काम केलं आहे. (Bollywood Actress Childhood Photo Fatima Sana Shaikh nmp)

Fatima Sana Shaikh :

अभ्यास करताना रडताना दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'दंगल' फेम अभिनेत्री फातिमा सना शेख आहे. दंगलमधील आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. फातिमा सना शेखने बॉलिवूडमध्ये आमिर खानसोबत (Aamir Khan) दोन चित्रपट केलं आहेत. एक चित्रपट 'दंगल' आहे आणि दुसर्‍या चित्रपटाचे नाव 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आहे. फातिमा सना शेख फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिक सॅम बहादूरमध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतही दिसू शकतात. फातिमा सना शेख नेटफ्लिक्स चित्रपट 'थर'मध्येही दिसली आहे.