मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा कित्येक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या अदा कायम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसल्या. अशा या अभिनेत्रींनी फक्त अभिनयानेच नव्हे, तर त्यांच्या इतर कारकिर्दीतूनही त्यांच्या मनाचा ठाव घेतला.
याच यादीतली एक अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंग. मॉडेल, अभिनेत्री, निर्माती अशा बहुआयामी रुपांमध्ये दिसणारी चित्रांगदा वयाच्या 46 व्या वर्षीसुद्धा चक्क फिटनेस फ्रीक मलायकाला टक्कर देत आहे.
सध्या अभिनयात सक्रिय असणारी मलायका एअर हॉस्टेस होऊ इच्छित होती. पदवी शिक्षणानंतर तिनं बऱ्याच विमानसेवा कंपन्यांमध्ये या पदासाठी मुलाखतीही दिल्या.
पण, तिच्या जीवनाला खरी कलाटणी कलाजगतामध्येच मिळाली. चित्रांगदा एका शीख जाट कुटुंबातून आली आहे.
तिचे वडील निरंजन सिंह हे लष्करात अधिकारी आहेत. तर, आई एक गृहिणी. चित्रांगदाचा भाऊ गोल्फ खेळात कारकिर्द करतो आहे.
चित्रांगदा सिंह चहल असं तिचं खरं नाव. एका मुलाखतीत तिनं खुलासा केला होता की, महाभारतातील अर्जुनाच्या पत्नींपैकी एकीच्या नावावरून चित्रांगदाचं नाव निवडलं गेलं आहे.
2003 मध्ये तिनं पहिल्यांदाच चित्रपटातून भूमिका साकारली. मुळची राजस्थानातील जोधपूर येथील असणाऱ्या चित्रांगदानं फार कमी वयात कला जगतामध्ये लोकप्रियता मिळवली.
चाळीशी उलटल्यानंतरही तिनं फिटनेसवर असंकाही लक्ष दिलं की, पन्नाशीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या या अभिनेत्रीनं चक्क मलायकालाही टक्कर दिली.