'माल है क्या?'; करिष्मासोबतचा दीपिकाचा चॅट व्हायरल

बी- टाऊनची आणखी एक आघाडीची अभिनेत्री अडचणीत येण्याची शक्यता   

Updated: Sep 22, 2020, 07:55 AM IST
'माल है क्या?'; करिष्मासोबतचा दीपिकाचा चॅट व्हायरल
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant singh rajput आत्महत्या प्रकरणी जोडूनच समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनला दर दिवशी आता नवी वळणं मिळू लागली आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये अनेक मोठ्या Bollywood बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं समोर आल्यामुळं धक्का बसत आहे. नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB एनसीबीकडून सदर प्रकरणाचा तपास आता अधिक वेगानं करण्यात येत असून, तपासाच्या कक्षाही बऱ्याच रुंदावल्याचं पाहायला मिळत आहे. 

अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स पाठवण्यात येणार आहे. त्यामागोमागच आता आणखी एक नवं नाव जोडलं गेलं आहे. हे नाव आहे, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रकाश. Deepika दीपिका आणि तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश यांचा एक चॅट सध्या व्हायरल होत आहे. हे चॅट जवळपास तीन वर्षे जुनं असल्याचं म्हटलं जात आहे. 

२८ ऑक्टोबर २०१७ 

दीपिका- तुझ्याकडे माल आहे का? 
करिष्मा- हो, पण घरी आहे. मी वांद्रयात आहे. तू म्हणत असलीस तर मी अमितला विचारते. 
दीपिका- हा. प्लीज... 
करिष्मा- अमितकडे आहे. तो घेऊन चालला आहे. 
दीपिका- हॅश आहे ना? वीड नाही
करिष्मा- हा. हॅश.... 
करिष्मा- तू कोको कधीपर्यंत येत आहेस? 
दीपिका - 11:30/12:00ish
दीपिका - Shal तिथं केव्हापर्यंत आहे? 
करिष्मा- बहुतेक त्यानं ११.३० म्हटलंय. कारण त्याला १२ पर्यंत दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे.

या चॅटमध्ये उल्लेख झालेलं 'कोको' हे एका रेस्तराँचं नाव आहे. कमला मिल्स येथे हे रेस्तराँ असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात दीपिकाच्या नावाची चर्चा होताच अभिनेत्री कंगना राणौत हिनं यावर आपली प्रतिक्रिया दिली. 'माझ्यामागे पुन्हा म्हणा, नैराश्य हा ड्रग्ज घेण्याचाच परिणाम आहे. आपण उच्चभ्रू असल्याचा आणि चांगल्या संगोपनात वाढल्याचा दावा करणारी ही सेलिब्रिटींची मुलं त्यांच्या मॅनेजरला विचारतात, माल है क्या?', असं ट्विट कंगनानं केलं. त्यामुळे आता कंगना विरुद्ध दीपिका असा नवा वादही समोर येण्याची चिन्हं आहेत.