close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'डॅडी' होण्यास हा बी- टाऊन अभिनेता सज्ज?

पाहा याविषयी त्याची पत्नी म्हणतेय तरी काय...

Updated: Aug 18, 2019, 10:40 AM IST
'डॅडी' होण्यास हा बी- टाऊन अभिनेता सज्ज?
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या रुपेरी पडद्यावरील भूमिकांसोबत खऱ्या आयुष्यातील भूनमिकांमुळे अर्थातच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही कायम प्रकाशझोतात असतात. मुळात प्रेक्षकांना सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी कमालीतचं कुतूहल असतं. त्यातही काही सेलिब्रिटी म्हणजे चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी येणारे. 

अशा आ सेलिब्रिटींच्या यादीत येणारी एक जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण. 'दीप-वीर' म्हणून चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या या जोडीचा एक अनोखा अंदाज नुकताच सोशल मीडियावर पाहायला मिळाला. हा अंदाज जास्तच लक्षवेधी ठरला, ते म्हणजे दीपिकाच्या एका कमेंटमुळे. 

एरवी एकमेकांच्या फोटोंवर कमेट करत प्रेम व्यक्त करणाऱ्या 'दीप- वीर'ने आता लाईव्ह व्हिडिओमध्येही त्यांच्या प्रेमाची ग्वाही दिली आहे. पण, यावेळी दीपिकाने रणवीरला एका वेगळ्याच नावाने संबोधलं आहे. 

इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान, दीपिका लाईव्ह येताच रणवीरच्या व्हिडिओवर तिने कमेंट केली. 'Hi Daddie', असं लिहित दीपिकाने या कमेंटमध्ये एका लहान बाळाचं आणि हार्ट शेपचं इमोजी वापरलं. तिची ही कमेंट पाहिल्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या. तिच्या या कमेंटनंतर इथे दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. तोच तिच्या या कमेंटनंतर रणवीरचा खास मित्र असणाऱ्या अभिनेता अर्जुन कपूर याची कमेंटही सर्वांचं लक्ष वेधून गेली. “Baba bhabhi is gonna give u one,”, असं लिहित अर्जुननेही या चर्चांना दुजोरा दिला. 

मुख्य म्हणजे आता ही बातमी खरी आहे, की नुसतीच चर्चा याविषयी खुद्द दीपिका- रणवीर कधी खुलासा करतात याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. दरम्यान, 'दीप-वीर'चं हे खुल्लम खुल्ला प्यार येत्या काळात एका चित्रपटातूनही पाहता येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित '८३`' या चित्रपटातून दीपिका रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता ही रिअल लाईफ पती- पत्नीची जोडी रिल लाईफमध्ये म्हणजेच रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.