अरेरे, काय हे...; पीपीई किट घालून रणवीरसाठी कपडे खरेदी करतेय दीपिका?

नेटकऱ्यांपैकी अनेकांनी मात्र रणवीरच्या या लूकची खिल्ली उडवली

Updated: Jul 26, 2022, 08:58 AM IST
अरेरे, काय हे...; पीपीई किट घालून रणवीरसाठी कपडे खरेदी करतेय दीपिका?  title=
Bollywood Actress Deepika padukone gets trolled because of ranveers nude photoshoot

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंग यानं सोशल मीडियावर त्याचे काही न्यूड फोटो शेअर केले. एका मासिकाच्या फोटोशूटच्या निमित्तानं त्यानं हे फोटोशूट केलं. रणवीरचे न्यूड फोटो सोशल मीडियावर एक ट्रेंड म्हणून सध्या कमाल चर्चेत आले आहेत. (Bollywood Actress Deepika padukone gets trolled because of ranveers nude photoshoot)

काही सेलिब्रिटींनी त्याच्या या फोटोशूटचं कौतुक केलं आहे, तर नेटकऱ्यांपैकी अनेकांनी मात्र रणवीरच्या या लूकची खिल्ली उडवली. आधी अतरंगी कपडे घालायचा, आता तेसुद्धा घालत नाही असं म्हणत अनेकांनी त्याच्यावर हल्लाबोल केला. 

रणवीरच्या या फोटोंची चर्चा थांबत नाही, तोच आता दीपिकालाही अनेकांनी निशाण्यावर घेतलं. सोमवारी बॉलिवूडची ही अभिनेत्री सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या घरातून बाहेर पडताना दिसली. 

दीपिकानं यावेळी पांढरा जम्पसूट झातला होता. फूल स्लिव्ह्ज जम्पसूट आणि साजेसा हेअरबन असा तिचा लूक यावेळी पाहायला मिळाला. पण, या लुकमुळंही ती ट्रोल झाली. 

'पीपीई किट कशाला घातलायस तू?' असं म्हणत काहींनी दीपिकाच्या लूकवर निशाणा साधला. तर, काहींनी ही पीपीई किट घालून रणवीरसाठी नवे कपडे खरेदी करायला गेली वाटतं अशाही प्रतिक्रिया केल्या. 

नवऱ्याची हवा हिलापण लागली वाटतं, असंही म्हणत काहीजणांनी या सेलिब्रिटी जोडीच्या फॅशन सेन्सवर कडाडून टीका केली. सातत्यानं होणारं ट्रोलिंग आणि न्यूड फोटोशूटचा हा मुद्दा पाहता आता रणवीर यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.