अन् त्या क्षणी भर मंडपात दीपिकाला रडू अनावर

तिने अश्रूंवाटे भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

Updated: Nov 19, 2018, 01:37 PM IST
अन् त्या क्षणी भर मंडपात दीपिकाला रडू अनावर  title=

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचीच चर्चा आणि जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे. एक अभिनेत्री म्हणून तिला आणि एक अभिनेता म्हणून रणवीरला चाहत्यांकडून मिळणारं हे प्रेम शब्दांत मांडता येणं निव्वळ अशक्य आहे.

बी- टाऊनच्या राम-लीलाच्या स्वप्नवत विवाहसोहळ्यातील काही माहिती आणि फोटो आता सर्वांसमोर येण्यास सुरुवात झाली आहे. अतिशय सुरेख अशा या विवाहसोहळ्यात फक्त कल्लाच झाला नाही. तर, काही भावनिक क्षणही आले, ज्यावेळी खुद्द दीपिकालाही तिच्या अश्रूंमा आवर घालणं शक्य झालं नव्हतं. 

'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दीपिका आनंद कारजमधील शबद या प्रथेच्या वेळी अतिशय भावुक झाली होती. त्यावेळी गायिका हर्षदीप कौर ही गुरबानीतील इक ओंकार या ओळी गात होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अखेरच्या फेऱ्याच्या वेळी दीपिका आणि तिचे वडील प्रकाश पदुकोण हे अतिशय भावुक झाले. ज्यानंतर त्या दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि अश्रूंवाटे भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

दीप-वीरच्या विवाहसोहळ्यात त्या क्षणी वडील-मुलीच्या नात्याची सुरेख आणि तितकीच हृदयस्पर्शी झलक पाहायला मिळाली असंही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीत म्हटलं गेलं आहे. 

अतिशय भावनिक अशा त्या प्रसंगी रणवीरने दीपिका आणि तिच्या वडिलांना सावरण्याचा  प्रय़त्न केला. रणवीर आणि दीपिकाच्या नात्याची ही अशी सुरुवात पाहता अनेकांनाच या विवाहसोहळ्याचा हेवा वाटत आहे.