'और पास....', रणवीरच्या वक्तव्यावर दीपिकाची भुवया उंचावणारी प्रतिक्रिया

तो असं काही बोलून गेला आहे की..... 

Updated: Oct 17, 2019, 05:00 PM IST
'और पास....', रणवीरच्या वक्तव्यावर दीपिकाची भुवया उंचावणारी प्रतिक्रिया

मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडी फक्त रुपेरी पडद्यावरच एकत्र झळकत प्रेक्षकांची मनं जिंकते असं नाही. तर, ही जोडी खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. एखादा पुरस्कार सोहळा असो किंवा मग कोणा एका सेलिब्रिटीच्या घरी आयोजित करण्यात आलेली छोटेखानी पार्टी असो, 'दीप-वीर' कायमच सर्वांचं लक्ष वेधतात. 

मुख्य म्हणजे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकमेकांपासून कधी दूर असले तरीही दीपिका आणि रणवीर यांचं सुरेख नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच पाहायला मिळतं. दीपिकाच्या अतिशय सुंदर फोटोंवर कायमच प्रतिक्रिया देणारा रणवीर सिंग पुन्हा एकदा खोडकर अंदाजात असं काही बोलून गेला आहे की दीपिकालाही त्यावर उत्तर देण्यापासून स्वत:ला रोखता आलेलं नाही. 

'हार्पर बझार यूएस'साठी करण्यात आलेल्या एका फोटोशूटमधील काही फोटो दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट केले. तिच्या प्रत्येक फोटोवर ज्याप्रमाणे चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, त्याचप्रमाणे तिच्या सर्वात मोठ्या चाहत्याने म्हणजेच रणवीरनेही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

दीपिकाच्या एका क्लोज अप फोटोमध्ये फक्त तिचे अतिशय बोलके डोळेच दिसत आहेत. त्यावर और पास.... अशी कमेंट रणवीरने केली आहे. त्याची ही कमेंट पाहता, 'अच्छा....? घर आजा मै बताती हू', असं उत्तर दीपिकाने दिलं आहे. विशेष म्हणजे यासोबतच तिने केरसुणीच्या चिन्हाचाही वापर केला आहे. तेव्हा ही सेलिब्रिटी जोडी यावेळी मात्र इतर जोडप्यांच्या अंदाजात दिसली असं म्हणत चाहत्यांनीही त्यांच्या या थट्टा मस्करीचा आनंद घेतला. 

रणवीरच्या कमेंटवर दीपिकाने दिलेली प्रतिक्रिया पाहता तीसुद्धा 'पत्नी'च्या रुपात आलीये बरं अशा प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिल्या. अशी ही सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी, येत्या काळात कबीर खान दिग्दर्शित '`८३' या चित्रपटातून झळकणार आहे. तेव्हा आता या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा 'दीप-वीर'चीच जादू पाहायला मिळणार यात शंका नाही.