दीपिकाच्या मॅनेजरच्या घरी NCBची धाड; पाहा पुढे नेमकं काय झालं....

इतकंच नव्हे तर.... 

Updated: Oct 27, 2020, 11:47 PM IST
दीपिकाच्या मॅनेजरच्या घरी NCBची धाड; पाहा पुढे नेमकं काय झालं....

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकराची चौकशी सुरु असतानाच या प्रकरणाला जोडून तपास सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाला पुन्हा एक नवं वळण मिळालं आहे. एनसीबीकडून सुरु असणाऱ्या तपासाअंतर्गत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीही चौकशीही करण्यात आली. इतकंच नव्हे तर काहींना एनसीबीनं ताब्यातही घेतलं. 

आता एनसीबीनं दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाश हिच्या घरी धाड टाकली, ज्यानंतर तिच्या घरातून ड्रग्ज जप्त केल्यानंतर तिला आता समन्सही बजावण्यात आलं आहे. 

करिष्माच्या घरातून अंमली पदार्थ सापडल्यानंतर तिला समन्स पाठवण्यात आलं खरं. पण, त्यानंतर एनसीबी ncb तिला मात्र ट्रॅक करु शकली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार 16/20 रिया केसमध्ये काही ड्रग्ज पेडलर्सच्या तपासणीमध्ये करिष्माचंही नाव समोर आलं होतं. ज्या आधारे एनसीबीनं तिच्या घरावर धाड टाकली. 

 

मुख्य म्हणजे एनसीबीनं करिष्माचीही चौकशी केली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार करिष्माच्या घरातून जवळपास 1.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. मुख्य म्हणजे अनेक ड्रग्ज पेडलर्सकडून करिष्माचं नाव घेण्यात आलं होतं. ज्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. आता करिष्माला समन्स बजावण्यात आल्यानंतर यापुढं एनसीबी कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.