दीपिकाने का नाकारली Photo Request? कारण जाणून म्हणाल...

अभिनेत्री दीपिका पदुकोन कायमच माध्यमांशी असणारं नातं जपायला ओळखली जाते.

Updated: Sep 13, 2021, 05:53 PM IST
दीपिकाने का नाकारली Photo Request? कारण जाणून म्हणाल... title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोन कायमच माध्यमांशी असणारं नातं जपायला ओळखली जाते. छायाचित्रकारांसाठी दीपिका म्हणजे आवडती अभिनेत्री. अशी ही अभिनेत्री आता म्हणे याच माध्यमांचा प्रतिनिधींना फोटोसाठी नकार देतेय.  असं सहसा होत नाही, पण यावेळी मात्र नेमकं हेच झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दीपिका हल्लीच बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिच्यासोबत डिनर डेटवर गेली होती. त्यावेळी अभिनेता रणवीर सिंग हासुद्धा सोबत होता. 

बी टाऊनच्या या स्टार जोडीला पाहताक्षणीच त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात झाली. यावेळी दीपिकाचा फोटो काढण्यासाठी म्हणून तिला विचारण्यात आलं. पण, या मस्तानीचा मात्र यावेळी नकार आला. दीपिकच हे उत्तर सर्वांसाठीच अनपेक्षित होत. पण यामागेही एक कारण होत. त्यावेळी तिथे P.V.Sindhu सुद्धा आल्यामुळे तिचे सोलो फोटो काढा माझे नको असं दीपिकाने सुचवलं. 

PV Sindhu Spends Fun Time with Ranveer Singh And Deepika Padukone; Photo  Goes Viral | Sports News Indiacom Deepika and Ranveer

Deepika Padukone, PV Sindhu stun in white, duo enjoys dinner together - In  Pics | People News | Zee News

Olympic 2021 मधे सिंधूची कामगिरी आणि देशासाठी तिन दिलेलं योगदान पाहता तिचा एकटीचा फोटो काढण्यासाठी दीपिकाने आग्रह केला. नंतर तिनेही सोलो फोटोसाठी पोज दिलीच, ही वेगळी बाब. पण फोटोला नकार देण्यामागील तिची भावना सर्वांचं मन जिंकून गेली हे मात्र खरं.