Style Statment : कसा वाटला दीपिकाचा हा लूक? यासाठी तुम्हाला मोजावी लागेल फक्त 'इतकी' किंमत

अरे व्वा... इतकी कमी किंमत......   

Updated: Sep 6, 2021, 03:43 PM IST
Style Statment : कसा वाटला दीपिकाचा हा लूक? यासाठी तुम्हाला मोजावी लागेल फक्त 'इतकी' किंमत
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे फॅशन फंडे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. यामध्येच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिच्या स्टाईल स्टेमेंटला चाहत्यांची विशेष दाद मिळते. दीपिकाचा लेहंगा लूक असो किंवा साडीतील लूक असो. कोणत्याही पेहरावामघध्ये ही अभिनेत्री तितकीच सुंदर दिसते. 

सध्या बॉलिवूडची ही सौंदर्यवती चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या एका नव्या आणि तितक्याच लक्षवेधी रुपामुळं. केबीसीच्या मंचावर दीपिकाचा हा लूक पाहायला मिळाला होता. ज्यामध्ये तिनं अतिशय वेगळ्या अंदाजात साडी नेसली होती. 

पिवळ्या रंगाचं प्लेटेड ब्लाऊज आणि मल्टीकलर प्लेटेड मटेरिअलची साडी, अशा लूकमध्ये ती सर्वांसमोर आली आणि पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. या लूकसाठी तिनं लोअर मेसी बन आणि निळ्याशार रंगांच्या कानातल्यांना पसंती दिली होती. स्मज आयलायनंरमुळं तिच्या या लूकला चार चाँद लागले. 

दीपिकाचा हा क्लासी लूक तुम्हालाही आवडलाय ना? आवडला असेलच तर आता तुम्हीही तिच्या या लूकला कॉपी शरु शकता. पायल खंडवालाच्या वेबसाईटवर ही साडी 19 हजार 800 रुपयांना विकली जात असल्याचं दाखवलं आहे. 

20 हजारांच्याही आत दीपिकाप्रमाणं लूक करण्याची संधी तुम्हाला आहे. त्यामुळं आता तुमचाही इतका बजेट असेल आणि गणेशोत्सव (Ganeshotsav), त्यासोबत पुढे येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांसाठी तुम्हीही नव्या लूकच्या शोधात असाल तर हा लूक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो.