आमच्यासोबत येणार का? पाहा, जान्हवीने कोणाला दिली ऑफर...

नुकताच याचा प्रत्यतही आला

Updated: Sep 20, 2019, 11:57 AM IST
आमच्यासोबत येणार का? पाहा, जान्हवीने कोणाला दिली ऑफर...
आमच्यासोबत येणार का? पाहा, जान्हवीने कोणाला दिली ऑफर...

मुंबई : 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर येत्या काळात आणखीही विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. असं असलं तरीही ती खासगी आयुष्यालाही तितकंच महत्त्वं देत आहे. एक अभिनेत्री म्हणून कलाविश्वात वावरत असताना जान्हवी तिच्यासोबत किंवा तिच्यासाठी वावरणाऱ्या व्यक्तींनाही तितकंच महत्त्वं देते, त्यांच्याशी खेळीमेळीचं नातं जपते. 

नुकताच याचा प्रत्यतही आला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये जान्हवी काही छायाचित्रकारांच्या गर्दीत सापडल्याचं दिसत आहे. एका निर्मिती संस्थेच्या कार्यालयातून बाहेर पडतेवेळीचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये  जान्हवीची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांची गडबड, धांदल पाहायला मिळत आहे. हे पाहून जान्हवीलाही हसू आवरता आलेलं नाही. 

आपला फोटो टीपण्यासाठी म्हणून आलेल्या या मंडळींना जान्हवी हात उंचावून पुढे जाते खरी. पण, तरीही छायाचित्रकार मात्र तिच्या कारच्या दरवाजापर्यंतही पोहोचले. हे पाहून जान्हवीने असं काही केलं जे पाहून तुम्हीही थक्कच व्हाल. आता तुम्ही कारमध्ये येणार का? थेट अशी ऑफरच या बी टाऊन अभिनेत्रीने छायाचित्रकारांना दिली. तिच्या या प्रश्नावर, 'नाही.... मॅम' असं म्हणत एकाने उत्तरही दिलं. या साऱ्यामध्ये जान्हवीचा सूर कुठेच उंचावला नव्हता. मोठ्या दिलखुलास अंदाजात तिनेच या छायाचित्रकारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं. 

जान्हवीच्या आगामी चित्रपटांविषयी सांगावं तर, गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकच्या चित्रीकरणात ती सध्या व्यग्र दिसत आहे. याशिवाय 'रुही अफजा', 'दोस्ताना २' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.