अरेरे... जान्हवी कपूरला विमानतळावरच रोखलं

श्रीदेवी यांच्या शोकसभेसाठी निघाली असतानाच.... 

Updated: Mar 4, 2020, 03:41 PM IST
अरेरे... जान्हवी कपूरला विमानतळावरच रोखलं
जान्हवी कपूर

मुंबई : बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच अभिनेत्री जान्हवी कपूर ही प्रकाशझोतात आली आहे. पहिल्या चित्रपटापासून विविध कार्यक्रमांमध्ये असणारा तिचा वावर हा कायमच चर्चेचा विषय. अतिशय कमी वेळात जान्हवीने बॉलिवूडमध्ये नावलौकिक मिळवलं. अशी ही नव्या जोमाची अभिनेत्री सहसा माध्यमांसमोर हसऱ्या चेहऱ्यानेच येते. पण, काही दिवसांपूर्वी मात्र ती चिंतातुर दिसली. 

आई, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या शोकसभेसाठी चेन्नईच्या दिशेने निघालेल्या दिशेने निघालेली जान्हवी मुंबई विमानतळवर पोहोचली खरी. पण, यावेळी विमानतळात प्रवेश करण्यापूर्वीच तिला रोखण्यात आलं. ज्यानंतर तिच्या चेहऱ्यावर काहीसे चिंतेचे भाव पाहायला मिळाले. 

विमानतळावर पोहोचणाऱ्या जान्हवीला रोखण्यामागचं कारणंही तितकंच महत्त्वाचं होतं. कारण, तिने यावेळी आवश्यक असणारं ओळखपत्र सोबत आणलं नव्हतं. ओळखपत्र म्हणून दाखवण्यात येणारी कागदपत्र, पुरावे जान्हवी विसरली होती. ही बाब लक्षात येताच तिने सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनाही याविषयी विचारलं. पण, त्यातही ती अपयशी ठरली. अखेर तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्टपणे दिसू लागले. 

अडचणीच्या याच प्रसंगी शेवटी जान्हवीने तिच्या मोबाईलमध्ये असणारं ओळखपत्र संबंधित अधिकाऱ्यांना दाखवलं ज्यानंतर तिला विमानतळात प्रवेश देण्यात आला. यावेळी जान्हवीने माध्यमांच्या प्रतिनिधींना मात्र आपण चिंतातूर असल्याचं जाणवू दिलं नाही. त्यांनी हाक मारताच तिने हसऱ्या चेहऱ्याने फोटोसाठी पोझही दिली. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

जान्हवीचं हे वागणं कायमच माध्यमांच्या प्रतिनिधींचं आणि चाहत्यांचं मन जिंकून जातं हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आगामी चित्रपटांच्या बाबतीत सांगावं तर, जान्हवी येत्या काळात रुही अफजाना, दोस्ताना २, गुंजन सक्सेना, तख्त या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी तिने तयारीही सुरु केली आहे. त्यापैकी काहींच्या चित्रपटांचं चित्रीकरण पूर्णही झालं आहे.