असं काय घडलं की, जुही चावलाला भर मैदानात ओरडला शाहरुख

जुही आणि शाहरुख तर एकमेकांचे मोठे विश्वासाचे मित्र, मग ....

Updated: Dec 2, 2021, 12:57 PM IST
असं काय घडलं की, जुही चावलाला भर मैदानात ओरडला शाहरुख
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री जुही चावला आणि अभिनेता शाहरुख खान या जोडीकडे हिंदी चित्रपट जगतातील एक अतिशय लोकप्रिय जोडी म्हणून पाहिलं जातं. ऑनस्क्रीन जोडीच्या रुपात झळकणाऱ्या या जोडीच्या मैत्रीचे किस्से सांगण्याजोगे असतात. मैत्रीपुरताच नव्हे, तर व्यवसायामध्येही ही जोडी एकमेकांची पार्टनर आहे. 

इतकं सगळं चांगलं असताना शाहरुख जुहीवरल वैतागतो. असं नेमकं का होतं, याचा खुलासा खुद्द जुहीनंच एका मुलाखतीत केला. 

एका प्रसंगाची आठवण शेअर करताना ती म्हणाली, 'आयपीएल सामना सुरु होता, त्यावेळी मला वाटत होतं की, मी शाहरुख आणि जय एकत्र उभे राहिलो तर काहीतरी चांगलं होई. 

एक अशी उर्जा तयार होईल, जे पाहून संघही चांगला खेळेल. मुळातच टीम चांगली खेळत नसेल तर, त्यावेळी मी देवाला आळवते. गायत्री मंत्र म्हणते.'

जुहीचं हे सारं सुरु असताना शाहरुख मात्र तिला ओरडतो. त्याचं ओरडणं हे मात्र संघासाठी असतं. 'अरे यार... तो फिल्डिंगप्रमाणे बॉलिंग का करत नाही, कसा खेळतोय तो... ये नीट नाही... मी टीम मिटिंग बोलवणार आहे', वगैरे वगैरे म्हणत शाहरुख जुहीला चढ्या स्वरात बोलत असतो. 

त्या प्रसंगी मी काय करु, असाच प्रश्न जुहीच्या मनात घर करुन जातो. शाहरुख सामन्यादरम्यान जरी चिडलेला दिसला तरीही तो संघासोबतच्या मिटिंगदरम्यान मात्र अगदी शांत असतो. पुढच्या वेळी चांगलं खेळू असं खेळाडूंना सांगून तिथून निघून जातो.