Vicky-Katrina Wedding: एखाद्या आश्चर्याहून कमी नाहीत विकी-कतरिनाच्या लग्नातील 'या' 7 गोष्टी

त्यांचं रिलेशनशिप अगदी शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं. 

Updated: Dec 8, 2021, 12:11 PM IST
Vicky-Katrina Wedding: एखाद्या आश्चर्याहून कमी नाहीत विकी-कतरिनाच्या लग्नातील 'या' 7 गोष्टी
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : राजस्थानातील जयपूरमध्ये सध्या धूम सुरु आहे ती म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची. बॉलिवूडमधील या आघाडीच्या दोन्ही कलाकारांनी त्यांचं रिलेशनशिप अगदी शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं. लग्नाबाबतही त्यांनी फारशी माहिती पाहुण्यांव्यतीरीक्त कोणापर्यंतही पोहोचू दिली नाही. 

बरं इथं येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियमही आखण्यात आले आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नात अगदी मेजवानीपासून प्रत्येक पाहुण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेपर्यंत सारंकाही खूप खास आहे. 

तुम्हारा हूँ मै और तुम मेरी... कतरिनावर खिळली विकीची नजर; Romantic Video व्हायरल 

 

चला तर मग, या अतिभव्य विवाहसोहळ्यातील काही खास मुद्द्यांवर नजर टाकत दृष्टीक्षेपातून पाहुया कॅट-विकीचा लग्नसोहळा.... 

* विवाहस्थळ आणि त्यानजीकच्या परिसरात ड्रोन दिसल्यास तो नष्ट करण्यात येणार आहे. 

* या समारंभासाठी सलमान खानला आमंत्रित करण्यात आलेलं नाही. 

* एका काचेच्या मंडपात विवाहविधी पार पडणार आहेत. 

* पाहुण्यांना या लग्नादरम्यान मोबाईल आणण्यास मनाई नाही. 

* इथं वधु-वराची सात पांढऱ्याशुभ्र घोड्यांवरून ग्रँड एंट्री होणार आहे. 

* कतरिनाच्या सर्व हिट गाण्यांवर इथे परफॉर्मन्स होणार आहेत. 

* पाहुण्यामंडळींना सिक्रेट कोडसोबतच काही नावंही देण्यात आली आहेत.