close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जेव्हा आजीने पाहिला कियाराचा orgasm सीन...

'लस्ट स्टोरी'तील या दृश्यामुळे बऱ्याच चर्चा झाल्या होत्या 

Updated: May 16, 2019, 02:31 PM IST
जेव्हा आजीने पाहिला कियाराचा orgasm सीन...

मुंबई : 'कलंक' या चित्रपटातून लहानशा पण तितक्याच महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. शाहिद कपूरसोबतच ती कबीर सिंग या चित्रपटातून प्रिती ही भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे, ज्यामध्ये शाहिदसोबतच तिच्याही भूमिकेचं कौतुक होत आहे. 

फक्त बॉलिवूडच नव्हे, तर कियारा दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सीरिजमुळेही नावारुपास आली होती. तिची अशीच एक बहुचर्चित वेब सीरिज म्हणजे 'लस्ट स्टोरीज'. ज्यामध्ये कियारा एका orgasm दृश्यामुळे चर्चेचा विषय ठरली होती. हस्तमैथुनाच्या या दृश्यामुळे बऱ्याच चर्चाही झाल्या होत्या. ज्याविषयी तिने आता एका कार्यक्रमात महत्त्वाचा उलगडा केला. 

कियाराच्या घरातल्या मंडळींनी त्या दृश्यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती, याविषयी तिने माहिती दिली. आईवडिलांना तिने या सीरिजविषयी आणि दृश्याविषयी कल्पना दिली होती. त्यामुळे ते एक प्रकारे या साऱ्यासाठी तयार होते. पण, यातील काही भाग कियाराच्या आजीला मात्र समजला नाही. त्या एँग्लो इंडियन असल्यामुळे काही संदर्भ त्यांना उमगले नाहीत. त्यामुळे हे दृश्य पाहतेवेळी तिच्या आजीच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. भावनाशून्य चेहऱ्यानेच त्यांनी ते पाहिलं होतं, असं कियाराने सांगितलं. कियाराची आजी तिच्याकडे राहण्यास आली होती, त्याचवेळी नेटफ्लिक्सवर 'लस्ट स्टोरीज' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती.