मलायका पुन्हा Out Of Control; पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला

तिची अदा कायमच सर्वांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली आहे. 

Updated: Mar 29, 2022, 10:42 AM IST
मलायका पुन्हा Out Of Control; पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : वाढत्या वयाची तमा न बाळगता आपल्या सौंदर्याला दिवसागणिक आणखी खुलवू पाहणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत मलाइका अरोरा (Malaika Arora) हिचं नाव अग्रस्थानी येतं. मलायकानं आजवर अनेकदा तिच्या रुपानं सर्वांनाच घायाळ करण्याचं काम केलं आहे. तिचं रुप आणि त्यातही तिची अदा कायमच सर्वांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली आहे. 

आयुष्याच्या काही वळणांवर आलेली आव्हानं अगदी ताकदीनं आणि तितक्याच सुंदर पद्धतीनं तिनं थोपवून लावली. 

अशी ही मॉडेल, अभिनेत्री आता एका नव्या आणि तितक्याच मोहक रुपात समोर आली आहे. लालबुंद फुल स्लिव्ह्ज असणाऱ्या या ड्रेसमध्ये मलायकाचं रुप उठून येत आहे. 

गडद लाल रंगाची लिप्स्टीक आणि मोकळे केस तिच्या या लूकला चार चाँद लावून जात आहेत. फॅशन सेन्सबाबतचं परफेक्शन म्हणजे काय हेच मलायकाचा हा लूक पाहताना लक्षात येत आहे. 

Malaika Arora Malaika Arora Malaika Arora

She Never fails असंच मलायकाचा प्रत्येक लूक पाहताना लक्षात येतं. हीच सौंदर्यवती सध्या तिच्या जीवनातील एका सुरेख वळणावर आहे. 

अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबतचं रिलेशनशिप ती मनसोक्त जगत आहे. प्रत्येक चढ ऊतारात ही जोडी एकमेकांना साथ देताना दिसत आहे. आता लक्ष वेधणारी बाब एकच, ती म्हणजे ही जोडी विवाहबंधनात केव्हा अडकते... 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x