'या' व्यक्तीमुळं मायलेकीच्या नात्यात मीठाचा खडा? पाहा काय म्हणतेय 'देसी गर्ल'ची आई

याच माय-लेकिच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यानं ... 

Updated: Apr 1, 2022, 11:13 AM IST
'या' व्यक्तीमुळं मायलेकीच्या नात्यात मीठाचा खडा? पाहा काय म्हणतेय 'देसी गर्ल'ची आई  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या परदेशातच जास्त वेळ व्यतीत करत असली तरीही तिची आपल्या देशाशी, आपल्या कुटुंबाशी घट्ट नाळ जोडली गेली आहे हे मात्र नाकारता येणार नाही. प्रियांकाच्या जीवनात काही व्यक्तींचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. त्यातील एक व्यक्ती म्हणजे तिची आई. (Priyanka chopra)

प्रियांकाच्या संघर्षाच्या दिवसांपासून ते अगदी तिच्या लग्नानंतर आणि आता थेट मातृत्त्वापर्यंत प्रत्येक वेळी आई, मधू चोप्रा यांनी तिला आधार दिला. 

वडिलांच्या निधनानं प्रियांका कोलमडली. पण, तिच्या आईनं मोठ्या धीरानं परिस्थिती सांभाळली. पण, आता म्हणे याच माय-लेकिच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यानं दुराव्याचं सावट ओढावलं आहे.

आता हे का आणि कसं झालं, याचा खुलासा खुद्द मधू चोप्रा यांनीच एका मुलाखतीत केला. 

मधू चोप्रा अजूनही प्रियांकाच्या लेकिला भेटल्या नाहीत. पण, फेसटाईमच्या माध्यमातून त्या तिची भेट घेत असतात. ती तिथं आनंदात असल्याचंही त्यांनी सांगितलं. असं असलं तरीही आता परदेशात गेल्यानंतर आपल्याला खरी परिस्थिती कळेल, असंही त्या म्हणाल्या. 

प्रियांकानं आई व्हावं असं आपल्या कुटुंबातील अनेकांनाच वाटत होतं. सर्वजण याच क्षणाची प्रतीक्षा करत होतो, असं म्हणत अखेर आज तो क्षण आला आहे अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. 

मला हा आनंद लपवता येत नसल्याचं म्हणत आता तर प्रियांका आणि तिच्या भावाचाही आपल्याला विसर पडल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर आता मला फक्त आणि फक्त त्या चिमुकलीचीच ओढ लागल्याचंही त्या म्हणाल्या. 

थोडक्यात काय, तर प्राधान्यस्थानी असणाऱ्या प्रियांकाचा प्राधान्यक्रम आता खाली आला असून, तिच्याच लेकिनं आजीच्या मनात जन्माला आल्यापासून घर केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x