close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निक एकटा पडताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; प्रियांका असं काही म्हणाली की....

.... हे पुन्हा एकदा सिद्ध झालं 

Updated: Aug 28, 2019, 10:31 AM IST
निक एकटा पडताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; प्रियांका असं काही म्हणाली की....

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ही जोडी कायमच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यामातून चाहत्यांना कपल गोल्स देत असते. नात्याची सुरुवात झाली तेव्हापासून ते अगदी निकच्या प्रत्येक यशामध्ये प्रियांका त्याची साथ देत असल्याचं पाहायला मिळतं. नात्यात ही साथच अधिक महत्त्वाची असते, प्रियांकाच्या एका नव्या पोस्टमधून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 

नुकतंच 'देसी गर्ल'चा पती, म्हणजेच अमेरिकन गायक निक जोनास याने एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्स २०१९ या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. याच सोहळ्यातील त्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. ज्यामध्ये निकचे दोन्ही भाऊ, जो आणि केविन हे त्यांच्या सहचारिणींसोबत म्हणजेच सोफी आणि डॅनिअलसोबत दिसत आहेत. पण, निक मात्र त्या दोघांच्याही मध्ये एकटाच उभा आहे, असं काहीसं चित्र त्या फोटोमध्ये दिसलं. 

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, काही क्षणांतच त्यावर असंख्य प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. ज्यामध्ये काही प्रमाणात एकट्या पडलेल्या निकची खिल्लीही उडवली गेली. आपल्या पतीविषयी येणाऱ्या या प्रतिक्रिया आणि व्हायरल होणाऱ्या या पोस्ट पाहून अखेर खुद्द प्रियांकानेच सर्वांच्या ट्रोल्सना सणसणीत उत्तर दिलं आहे. 

पुरस्कार सोहळ्यातील व्हायरल होणारा तोच फोटो प्रियांकाने पोस्ट केला. पण, त्याचं फोटोशॉप व्हर्जन तिने सर्वांसमोर आणलं, ज्यामध्ये निक एकटा दिसत नसून त्याची पत्नी प्रियांकाही त्यात सोबत दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी कायमच तुझ्यासोबत आहे निक.... '. पतीची अनोख्या पद्धतीने साथ देत प्रियांकाने जो आणि केविनचं अभिनंदनही केलं. पण, या साऱ्यामध्ये तिचा हा अंदाज मात्र अनेकांचं मन जिंकून गेला हे खरं.