भावाशी नाव जोडलं जाताच लोकप्रिय अभिनेत्रीची झोप उडाली; रडून रडून झाली अशी अवस्था

त्याबाबतच जोरदार चर्चाही झाली

Updated: Jan 5, 2022, 10:17 AM IST
भावाशी नाव जोडलं जाताच लोकप्रिय अभिनेत्रीची झोप उडाली; रडून रडून झाली अशी अवस्था  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर अनेकचा चर्चा केली जाते. चाहते असो किंवा मग कलाजगतातील मंडळी, कोणाच्याही खासगी आयुष्यातील माहिती समोर आल्यानंतर यात अनेकांचं लक्ष वेधलं जातं. 

अभिनेत्री रवीना टंडन हिच्याही खासगी जीवनाचे अनेक पैलू समोर आले. फक्त समोर आले नाहीत, तर त्याबाबतच जोरदार चर्चाही झाली. (raveena tandon )

एका मुलाखतीत रवीनानं खुलासा केला की, एक वेळ अशी आली होती, जेव्हा तिचं नाव तिच्याच भावाशी जोडलं गेलं होतं. 

ती वेळ आणि ती बातमी मन सुन्न करणारी होती. त्यावेळी मुख्य बाब अशी होती की, रवीना स्वत:ची बाजूही मांडू शकत नव्हती. 'आम्ही पत्रकारांच्या दयेवर मोठे होत होतो', असं ती म्हणाली. 

सहकलाकारांनाही आपण मित्रच मानत होतो, पण मासिकांच्या संपादकांना मात्र हे मान्य नव्हतं; असं रवीना म्हणाली. 

अतिशय विषण्ण करण्याऱ्या त्या अनुभवाविषयी सांगताना रवीना म्हणाली, 'मला आठवतंय की मी कित्येक रात्री झोपलेही नव्हती. सतत रडत होते. घाबरत होते. 

कोणा एका वर्तमानपत्रानं माझी, माझ्या प्रतिष्ठेची आणि माझ्या कुटुंबाची राखरांगोळी केली होती. हा माझ्यासाठी एक मोठा धक्का होता.'

माझं नाव त्यांनी माझ्याच भावाशी जोडलं होतं, असं सांगत एता मोठ्या मासिकातही हुबेहूब असंच वृत्त छापण्याच आल्याचं तिनं सांगितलं.

'एक रुबाबदार, शुभ्रवर्णाचा मुलगा रोज रवीनाला सोडण्यासाठी येत आहे. आम्ही ही माहिती मिळवलीये की हा तिचा प्रियकर आहे', असं तिच्या आणि तिच्या भावाबाबत लिहिण्यात आलं होतं. 

सरोगसीच्या वेदना नाही विसरलीये सनी; 4 मुली गमावल्यानंतर...

 

आपण या साऱ्यावर नेमकं काय स्पष्टीकरण देणार असं सांगत तिनं आपली त्यावेळची हतबलता सर्वांसमोर आणली. 

रवीनानं हिंदी कलाविश्वात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट साकारले, प्रसिद्धीही मिळवली. 

आज ती बरीच पुढे आलेली असली तरीही तिच्या मनात ही कटू आठवण कायमची घर करुन राहिली असंच म्हणावं लागेल.